Supreme Court – सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संपत्ती किती? सामान्य नागरिकांनाही जाणून घेता येणार
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या न्यायाधीशांच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात घेण्यात आला आहे. या बैठकीमध्ये न्यायाधीशांनी त्यांच्या संपत्तीची सर्व माहिती सार्वजनिक करण्यास एकमताने सहमती दर्शवली आहे. न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यासह 30 न्यायाधीशांनी आपल्या संपत्तीची माहिती प्रकाशित केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, 1 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीमध्ये न्यायाधीशांनी संकल्प केला होता की, न्यायाधीश जेव्हा पदावर विराजमान होतील किंवा एखादी महत्त्वाची जबाबदारी पार पाडतील, तेव्हा संबंधित न्यायाधीशाला मुख्य न्यायाधिशांच्या समक्ष आपल्या संपत्तीची घोषणा करावी लागले. 1997 च्या प्रस्तावानुसार आतापर्यंत सरन्यायाधीशांच्या समोर संपत्तीची माहिती देण्यात येत होती. परंतु, 2009 साली न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर न्यायाधीशांना आपल्या संपत्तीची घोषणा करण्याची स्वेच्छिक आधारावर अनुमती देण्यात आली होती. तेव्हा काही न्यायाधीशांनी आपली संपत्ती वेबसाईटच्या माध्यमातून जाहीर केली. याच विषयावर पुन्हा एकदा सर्व न्यायाधीशांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्वानुमते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना वेबसाईटवर संपत्ती जाहीर करावी लागणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व न्यायाधीशांना याला अनुमती दिली आहे.
संपत्तीची घोषणा करणाऱ्या न्यायधीशांमध्ये सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई, न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती जे. के. मोहेश्वरी यांचा समावेश आहे. त्यामुळे न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर सर्व सामान्य नागरिकांना सुद्धा न्यायाधीशांच्या संपत्तीची तपशीलवार माहिती जाणून घेता येणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List