सचिनच्या लेकीची क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री! मुंबई फ्रँचायझीची मालकीण बनली सारा

सचिनच्या लेकीची क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री! मुंबई फ्रँचायझीची मालकीण बनली सारा

यंदाच्या वर्षीचा IPL 2025 सीजन सध्या जोमात सुरू आहे. एकामागून एक धमाकेदार सामने सुरू असताना सामन्यांदरम्यान माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने एक क्रिकेट संघ खरेदी केला आहे. डिजिटल मनोरंजन आणि तंत्रज्ञानातील आघाडीची कंपनी जेटसिंथेसिसने याबाबत घोषणा केली आहे. सारा तेंडुलकरने ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग (GEPL) मध्ये मुंबई फ्रँचायझी खरेदी केली आहे.

GEPL ही जगातील सर्वात मोठी ई-क्रिकेट आणि मनोरंजन लीग आहे. ही लीग “रिअल क्रिकेट” गेमवर खेळली जाते. आतापर्यंत 30 कोटींहून अधिक लोक या गेमचा आनंद घेत आहेत. GEPL चा मल्टीप्लॅटफॉर्म रीच 70 दशलक्षाहून अधिक आहे. तर इतर ओटीटी प्लॅटफॉर्म JioCinemas आणि Sports18 वर 2.4 दशलक्षाहून अधिक गेला आहे. यामुळे GEPL ने क्रिकेट ई-स्पोर्ट्समध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

JetSynthesys चे सीईओ राजन नवानी यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. ‘मुंबई संघाची फ्रँचायझीची मालक म्हणून सारा तेंडुलकरचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. साराला खेळ आणि ई-स्पोर्ट्समध्ये खूप रस आहे आणि तिच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे तिला आमच्या मोहिमेत एक चांगला अनुभव घेता येईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, सारा तेंडुलकरनेही आपले मत व्यक्त केले आहे. क्रिकेट हा आमच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. GEPL मध्ये मुंबई फ्रँचायझीची मालकी मिळवणे हे माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण झाले आहे. यामध्ये खेळावरील माझे प्रेम आणि शहराबद्दलची आवड यामार्फत दिसून येईल, असे ती यावेळी म्हणाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Manoj Kumar यांची अखेरच्या क्षणी कशी होती अवस्था, कोणाशी साधला शेवटचा संवाद? मुलगा म्हणाला… Manoj Kumar यांची अखेरच्या क्षणी कशी होती अवस्था, कोणाशी साधला शेवटचा संवाद? मुलगा म्हणाला…
Manoj Kumar: ‘जिंदगी एक पहेली है, कभी दुश्मन कभी सहेली है…’, आपल्या सिनेमांमधून अनेकांना जगण्याची नवी उमेद देणारे दिग्गज अभिनेते...
राज कुमार यांनी हत्या का केली? जुहू बीचवर मुलीसोबत काय घडलं? अभिनेत्याने रागाच्या भरात केली हत्या
होय, मी अपशब्द म्हणालो पण त्यापेक्षा मोठी शिवी..; अक्षय कुमार असं का म्हणाला?
धनंजय माने इथेच राहतात का? Ghibli वर ‘अशीही बनवाबनवी’ ट्रेंड; डायलॉग ओळखाच
Manoj Kumar: ओसामा बिन लादेनच्या हत्येची जागा आणि ‘त्या’ जागेसोबत मनोज कुमार यांचं खास कनेक्शन
मनोज कुमार यांनी कुटुंबासाठी किती मिलियन डॉलर्सची संपत्ती मागे सोडली?
’95 टक्के महिलांना…’, सेक्सबद्दल नीना गुप्ता यांचं मोठं वक्तव्य, पुरुषांबद्दल म्हणाल्या…