मंडणगड एसटी डेपो दुर्गंधीच्या विळख्यात; स्वच्छता गृहाच्या साफसफाईचा आगार व्यवस्थापनाला विसर

मंडणगड एसटी डेपो दुर्गंधीच्या विळख्यात; स्वच्छता गृहाच्या साफसफाईचा आगार व्यवस्थापनाला विसर

मंडणगड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एसटी डेपोच्या आवारातील स्वच्छतागृहातील अस्वच्छतेमुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतागृहात ड्रेनेज लाईनचा अभाव असल्याने स्वच्छतागृहातील टाकीतच मलमूत्र साठून राहत असल्याने बस स्टॅण्डच्या आवारात दुर्गंधी पसरली आहे. मंडणगड एसटी आगार प्रशासन मल नि:सारण व्यवस्थेकडे दुर्लक्ष करत आहे.

मंडणगड तालुक्याचे ठिकाण असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एसटी डेपो येथे आहे. यामुळे तालुक्यातील प्रवाशांसह अन्य तालुक्यातील प्रवासी आणि लांब पल्ल्याच्या एसटी प्रवाशांचीही ये-जा असते.

स्वच्छतागृहाच्या बाहेरील दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भाव होण्याचा संभाव्य धोका आहे. असे असताना देखील एसटी प्रशासन प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची समस्या सोडविण्यासाठी अजिबात लक्ष देत नाही. यावरुन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची विकासाप्रती असलेली उदासीनता स्पष्टपणे दिसत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

National Kho-Kho Championship 2024-25 – महाराष्ट्राच्या महिलांची जोरदार मुसंडी, पुरुष गटात रेल्वेने मारली बाजी National Kho-Kho Championship 2024-25 – महाराष्ट्राच्या महिलांची जोरदार मुसंडी, पुरुष गटात रेल्वेने मारली बाजी
महाराष्ट्राच्या महिला संघाने दिमाखदार खेळाचे प्रदर्शन करत 57व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत विजेतेपदावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात त्यांनी यजमान...
Nuts Benefits- आपल्या आहारासाठी बदाम आणि शेंगदाणे वरदानापेक्षा कमी नाही! वाचा सविस्तर
वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव, याचिका केली दाखल
Weight Loss- वजन कमी करण्यासाठी या दोन्ही बियांचा दैनंदिन जीवनात समावेश आहे गरजेचा; वाचा सविस्तर
Hair Mask- केस गळतीवर हा हेअर मास्क आहे सर्वात उत्तम, केस सुंदर चमकदारही होतील
Rain Alert – मुंबईत पुढील 3-4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
तेजस्वी घोसाळकरांना व्हॉट्सअॅपवरुन जिवे मारण्याची धमकी, पोलिसात तक्रार दाखल