शक्तिपीठ महामार्ग व कर्जमाफी या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर शिंदेंना अडवणार, कुणाल कामराचं गाणं वाजवून विरोध करणार

शक्तिपीठ महामार्ग व कर्जमाफी या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर शिंदेंना अडवणार, कुणाल कामराचं गाणं वाजवून विरोध करणार

शक्तिपीठ महामार्ग व कर्जमाफी या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर येत्या 5 एप्रिल रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडवण्यात येणार आहे, तसेच स्टॅन्डअप काॅमेडीयन कुणाल कामरा याचे विडंबनात्मक गाने वाजवून विरोध करण्यात येणार असल्याचा, इशारा शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आला आहे. तसेच येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी कोणत्याही मंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वज फडकवू देणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

विधानसभा निवडणूक प्रचारावेळी कोल्हापूरात तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करतो, असे सांगितले होते. तसेच निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे देखील आश्वासन दिले होते. पण सत्तेवर आल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या या दोन्ही जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर महायुती सरकारने सपशेल घुमजाव केले आहे. या पार्श्वभूमीवर आज शासकीय विश्रामगृहात शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक पार पडली.

“एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन सरकार व पक्षाशी गद्दारी केली, तेव्हा जनतेने हलकेपणाने घेतले. पण आता शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे व कर्जमाफीचे आश्वासन देऊन देखील न पाळता शेतकऱ्यांची गद्दारी करत असतील तर, कोल्हापूरातील शेतकरी तसेच सामान्य जनता हे सहन करणार नाही. महाराष्ट्रात गेल्यावर्षी 2 हजार 900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दररोज आठ शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असताना विजयी मेळावा घेणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. दि.12 मार्चला मुंबईतील मोर्चात देखील एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना भेटले नाहीत. त्यामुळे त्यांना आता कोल्हापूरात फिरकू देणार नाही. कुणाल कामराचं गाणं लावून एकनाथ शिंदे यांचा विरोध होईल.” असे यावेळी बोलताना समितीचे समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले.

“महायुती सरकार हे सातत्याने आंदोलन करणाऱ्यांवर दडपशाही करत आहे. या दडपशाहीला कोल्हापूरातील जनता भिक घालणार नाही. शक्तिपीठ महामार्ग रद्द करून व कर्जमाफीचा आदेश घेऊनच एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरात पाय ठेवावा. अन्यथा कोल्हापूरी हिसक्याला सामोरे जावे.” असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले. “निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचे पालन न करणे म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीचे पतन आहे. महाराष्ट्राच्या तिजोरी मध्ये खडखडाट असताना 86 हजार कोटी कर्ज काढून शक्तिपीठ महामार्ग कशाला पाहिजे. या पैशातूनच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. अन्यथा कोल्हापूरात पाय ठेवू नये.” असे गोकुळ संचालक प्रकाश पाटील म्हणाले. शिवाजी कांबळे म्हणाले, सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये सुरा खुपसण्याचे काम करत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्यासाठी सरकार एजंट ना पाठीशी धरून महामार्गाला समर्थन असल्याचे भासवत आहे.

यावेळी सुरेश बन्ने, किसान सभेचे नामदेव पाटील, दिनकर सूर्यवंशी, वृषभ पाटील, तानाजी भोसले, शिवाजी पाटील, सदानंद कदम, युवराज पाटील, जालिंदर कुडाळकर, वाय.एन.पाटील, मारुती नलवडे, सर्जेराव पाटील, सदाशिव पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD weather forecast : वादळाचा तडाखा, महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हाय अलर्ट IMD weather forecast : वादळाचा तडाखा, महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हाय अलर्ट
मोठी बातमी समोर येत आहे, गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक भागांमध्ये जोरदार पावसासह गारपिटीचा...
“देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो”, मोदींपासून ते फडणवीसांपर्यंत सर्वांनी मनोज कुमार यांच्याबद्दल व्यक्त केल्या भावना
सर्वांसमोर अमरीश पुरींनी स्मिता पाटीलच्या लगावली होती कानशिलात, नंतर अभिनेत्रीने जे काही केलं…
मोहम्मद युनूस पंतप्रधान मोदींना भेटले, शेख हसीना यांच्या हस्तांतरणाचा मुद्दा मांडला
National Kho-Kho Championship 2024-25 – महाराष्ट्राच्या महिलांची जोरदार मुसंडी, पुरुष गटात रेल्वेने मारली बाजी
Nuts Benefits- आपल्या आहारासाठी बदाम आणि शेंगदाणे वरदानापेक्षा कमी नाही! वाचा सविस्तर
वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव, याचिका केली दाखल