Dapoli News – एसटी बसचे ब्रेक फेल अन् थरार, चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांना जीवदान

Dapoli News – एसटी बसचे ब्रेक फेल अन् थरार, चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांना जीवदान

दापोली तालुक्यातील दाभोळ येथून दापोलीकडे येणाऱ्या बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याची घटना घडली आहे. ब्रेक लागत नसल्यामुळे चालक भाऊराव धोत्रे यांनी प्रसंगावधान दाखवत एसटी बस थेट रस्त्याला लागून असलेल्या गटारामध्ये उतरवली. या अपघातात एसटीचे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल भाऊराव धोत्रे हे एसटी बस घेवून दाभोळहून दापोलीच्या दिशेने जात होते. याचवेळी बस वळणे येथे आली असता त्यांनी गाडीचा ब्रेक मारला असता ब्रेक लागला नाही. बसचे ब्रेक फेल झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने गाडी थांबविण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या गटारात बस उतरवली. या अपघातात बसमधून प्रवास करणारे काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारांसाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आसे असून एसटी बसचे अंदाजे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती दापोली पोलीस ठाण्यात चालक राहुल भाऊराव धोत्रे यांनी दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक गायकवाड करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD weather forecast : वादळाचा तडाखा, महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हाय अलर्ट IMD weather forecast : वादळाचा तडाखा, महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हाय अलर्ट
मोठी बातमी समोर येत आहे, गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक भागांमध्ये जोरदार पावसासह गारपिटीचा...
“देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो”, मोदींपासून ते फडणवीसांपर्यंत सर्वांनी मनोज कुमार यांच्याबद्दल व्यक्त केल्या भावना
सर्वांसमोर अमरीश पुरींनी स्मिता पाटीलच्या लगावली होती कानशिलात, नंतर अभिनेत्रीने जे काही केलं…
मोहम्मद युनूस पंतप्रधान मोदींना भेटले, शेख हसीना यांच्या हस्तांतरणाचा मुद्दा मांडला
National Kho-Kho Championship 2024-25 – महाराष्ट्राच्या महिलांची जोरदार मुसंडी, पुरुष गटात रेल्वेने मारली बाजी
Nuts Benefits- आपल्या आहारासाठी बदाम आणि शेंगदाणे वरदानापेक्षा कमी नाही! वाचा सविस्तर
वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव, याचिका केली दाखल