शिर्डी विमानतळावरून रविवारपासून नाईट लँडिग

शिर्डी विमानतळावरून रविवारपासून नाईट लँडिग

काकडी येथील शिर्डी विमानतळावरून रविवारपासून (दि. 30) नाईट लेंडिंग सुरू होणार आहे. दि. 30 मार्चला रात्री 9 वाजून 50 मिनिटाने शिर्डी विमानतळावरून हैदराबादकडे विमान उड्डाण करेल व या विमानतळावरून नाईट लैंडिंगची अधिकृत सुरुवात होईल. नाईट लैंडिंगमुळे शिर्डी विमानतळाच्या प्रगतीत भर पडेल.

शिर्डी विमानतळ प्रशासनाकडून नाईट लैंडिंगची घोषणा करण्यात आली नसली तरी ऑनलाइन बुकिंगमध्ये दोन दिवसांपासून या विमानतळावरून रात्रीची हैदराबाद विमानसेवेची बुकिंग सुरू झाली आहे. त्यामुळे या विमानतळावरून मार्च एण्डला रात्रीची विमानसेवा सुरू होणार आहे. गेल्या आठ वर्षांपासून नाईट लैंडिंगची साईभक्तांना प्रतीक्षा होती. नाईट लैंडिंग सुरू झाल्यानंतर या विमानतळाच्या विकासात नवीन पाऊल ठरणार आहे. अनेकवेळा नाईट लैंडिंगची घोषणा झाली होती. मात्र, प्रत्यक्षात सुरुवात झालीच नाही.

शिर्डी विमानतळ सुरू झाल्यापासून प्रवाशांच्या सर्वाधिक पसंतीला उतरलेले विमानतळ आहे. सध्या या विमातळावरून दिवसा 8 विमाने येतात आणि जातात. दिवसभरात 16 फेऱ्या या विमानतळावरून सुरू आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने नाईट लौंडंगसाठी आवश्यक असलेली सर्व कामे पूर्ण करत केंद्राकडे परवानगी मागीतली होती. केंद्राच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने फेब्रुवारी 2023 मध्ये नाईट लैंडिंगला परवानगी दिली. त्यानंतर एप्रिल 2023 मध्ये दिल्लीहून आलेल्या इंडिगो एअरलाइन्सचे पहिल्या रात्रीच्या विमानाची यशस्वी चाचणी झाली आणि या विमानतळाच्या विस्ताराचे आणि परिसराच्या प्रगतीचे एक नवे दालन खुले झाले. यशस्वी चाचणीनंतर दोन वर्षाने ही सेवा सुरू होत आहे.

नाईट लौंडंग सुरू झाल्यानंतर काकडआरतीला उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांना रात्री प्रवास करून येता येणार आहे. एकूणच भाविकांना मोठ्या सुविधा निर्माण होणार आहेत. रात्रीच्या विमानसेवेमुळे या परिसराच्या विकासाला गती प्राप्त होणार आहे. शिडर्डीत भाविकांच्या संख्येतही मोठी वाढ अपेक्षित असून, त्यामुळे स्थानिक अर्थकारणाला गती प्राप्त होईल. तुलनेने रात्रीचे भाडे कमी असल्याने साईभक्तांना ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.

रात्रीच्या विमानसेवेसाठी आवश्यक सीआयएसएफ जवानांची फौज विमानतळाकडे केंद्राने उपलब्ध करून दिली आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोलसाठी गरजेचे असलेला कर्मचारी वर्ग अजून दाखल झालेला नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘…तर तुमच्यावरच बुमरँग होईल’, दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया ‘…तर तुमच्यावरच बुमरँग होईल’, दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर...
राज्य सरकारचा शिक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय, आता राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना CBSE अभ्यासक्रम
‘या सगळ्या गोष्टीमागे…’; दिशा सालियन प्रकरणावर थोरातांची पहिली प्रतिक्रिया
“अपने टाइप का लडका देखो”; धनश्री-चहलच्या घटस्फोटानंतर चहलच्या कथित गर्लफ्रेंडचा व्हिडीओ समोर
‘KBC 16’ मुळे 7 महिन्यांत अमिताभ बच्चन मालामाल; शोमधून तब्बल एवढ्या कोटींची कमाई
40 वर्षाच्या अंकिता लोखंडेला थेट आलियाच्या आईच्या रोलसाठी विचारलं, अंकितानेही दिलं सडेतोड उत्तर
हिरवी मिर्ची खाल्ल्यास पिकल्या पानाचा देठ होणार ‘हिरवा’, फायदे जाणून पुरूष आजपासूनच सुरू करतील खाणे