प्रेग्नेंट महिलेवर कमेंट केली, दारू पिऊन लोकांशी गैरवर्तन; कपिल शर्माचे वाद चर्चेत
टीव्ही जगतातील एक लोकप्रिय विनोदी कलाकार तथा अभिनेता कपिल शर्मा ओटीटीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. कपिल आज म्हणजे 2 एप्रिल रोजी त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. कपिलचा आधीचा शो असो किंवा आताचानेटफ्लिक्सवर दाखवला जाणारा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ कपिल प्रेक्षकांचे इतक्या वर्षांपासून मनोरंजन करत आहे. एकीकडे, कपिल लोकांचे मनोरंजन करण्यास नेहमी पुढे असतो. कपिलचे सामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वच फॅन आहेत.
प्रेग्नेंट महिलेवर विनोद पडला महागात
तर दुसरीकडे, कपिल त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. कपिल शोमधील त्याच्या अनेकदा विनोदांमुळे, किंवा एखाद्या कमेंटमुळे वादात सापडला आहे. कपिल शर्माचे अनेक वाद असे आहेत ज्यांची चर्चा आजही होते. जसं की, एकदा, स्टँड-अप अॅक्ट करताना, कपिलने रस्त्यांवरील खड्ड्यांची तुलना गर्भवती महिलांशी केली होती. तो म्हणाला होता “अशा रस्त्यांचा एक फायदा आहे.’ जर एखादा गरीब माणूस त्याच्या गर्भवती पत्नीसोबत जात असेल लआणि त्याला मोठा खड्डा लागला तर प्रसूती तिथेच होईल” .
यानंतर एका स्वयंसेवी संस्थेने कपिलविरुद्ध महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली होती. एवढेच नाही तर कपिलवर आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव पुरस्कार 2015 मध्ये मोनाली ठाकूर, तनिषा मुखर्जी आणि इतर महिला पाहुण्यांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोपही त्याच्यावर झाला आहे.
मनोरंजन साइटच्या संपादकाला फोन करून शिवीगाळ
एवढंच नाही तर कपिल दारू पिण्यावरून बऱ्याच वादात अडकला आहे. त्याने स्वतः सांगितले होते की वादात अडकल्यानंतर त्याने ड्रग्ज घेण्यास सुरुवात केली होती आणि अनेक वेळा तो लोकांशी गैरवर्तनही करत असायचा. कपिलने एकदा एका मनोरंजन साइटच्या संपादकाला फोन करून शिवीगाळही केली होती. त्याच वेळी, त्याने एकदा त्याच्या ट्विटर (आता एक्स) हँडलवर पंतप्रधान मोदींना टॅग करून बीएमसीबद्दल तक्रारही केली होती. नंतर त्याने सांगितले की त्याने हे दारूच्या नशेत केले होते.
आईची नाराजी होती
एवढंच नाही तर त्याचा आणि अभिनेता सुनील ग्रोवरचा वाद तर सर्वांनाच माहित आहे. त्यानंतर सुनीलने त्याचा शो देखील सोडलाहोता. कपिलच्या या सर्व गोष्टींवर त्याची आई फार नाराज होती. त्यानंतर त्याने हे सर्व गोष्टी सोडून देण्याचा निर्णय घेतला.
अनेक स्टार्स त्याच्या सेटवरून शुटींग न करता परतले
कपिलच्या शोमध्ये कॉमेडी तर असतेच, पण बॉलिवूडचे मोठे स्टारही त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी येथे येतात. या शोमध्ये सर्व कलाकार अतिशय आनंदी मूडमध्ये दिसत असतात आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही किस्सेही सांगतात. तथापि, एकदा कपिलने त्याच्या सेटवरून अनेक स्टार्सना परत पाठवल्याचंही म्हटलं जातं. ज्यामुळे त्याला खूप टीकेला सामोरेही जावे लागले होते. जसं की शाहरुख, अजय देवगण, दिशा पटानी, टायगर श्रॉफ सारखे स्टार कपिलच्या शोमधून शूटिंग न करता परतले असल्याचं म्हटलं जातं. याबद्दल बराच वादही झाला होता. पण तरीही कपिल शर्मा हे नाव नक्कीच त्याने तेवढी मेहनत करून मोठं केलं आहे. आणि बॉलिवूडमधील सर्वजण त्याच्या या संघर्षाचा नक्कीच आदर करतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List