हरयाणात एका म्हशीची 5.11 लाख रुपयांना विक्री
हरयाणात एका म्हशीची तब्बल 5 लाख 11 हजार रुपयांना विक्री झाली. ही म्हैस मुर्रा जातीची आहे. या म्हशीचे वैशिष्टय़ म्हणजे ती दररोज 25 लिटर दूध देते. विक्रम लांबा यांची ही म्हैस आहे. म्हैस विकल्याची बातमी पसरताच आजूबाजूच्या गावांतील अनेक ग्रामस्थ चींदलिया गावात पोहोचले. त्यांनी म्हैस खरेदी करणारे अनिल यादव यांच्याशीही चर्चा केली.
अनिल यादव यांनी सलग तीन वेळा येऊन म्हशीचे दूध तपासले आहे. तिन्ही काळात म्हशीने सकाळी आणि संध्याकाळी 25 ते 26 लिटर दूध दिले आहे. त्यानंतर अनिल यादव यांनी या म्हशीसाठी पाच लाख रुपये मोजले. गावकऱ्यांनी म्हशीच्या दूध उत्पादन क्षमतेबद्दल आणि तिच्या तंदुरुस्तीबद्दल अनेक प्रश्न विचारले. एका म्हशीसाठी पाच लाख रुपये मोजल्याने या म्हशीची आजूबाजूच्या गावांत चर्चा सुरू आहे.
‘सुलतान’ला 21 कोटींची बोली
कैथलच्या बुधाखेडा गावातील शेतकरी नरेश यांचा बैल सुलतानदेखील मुर्रा जातीचा होता. तो हरयाणाचा सर्वात प्रसिद्ध आणि महागडा बैल ठरला. या बैलाचे वजन 1.5 टन इतके आहे. सुलतानची किंमत 21 कोटी रुपयांपर्यंत होती. सुलतान वर्षाला 30 हजार वीर्य डोस देत असतो. जे लाखो रुपयांना विकले जात आहे. त्यामुळे सुलतानला 21 कोटी रुपयांना बोली लावून खरेदी करण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List