ही अभिनेत्री लग्नाशिवाय प्रेग्नेंट? बेबी बंपसोबत अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल
बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नाआधीच गुडन्यूज देऊन चाहत्यांना सरप्राइज केलं होतं. आता या यादीत अजून एका अभिनेत्रीचा समावेश करण्यात आला आहे. ही अभिनेत्री आहे अभिनेता बॉबी देओलच्या सर्वात लोकप्रिय मालिकेतील ‘आश्रम’मधून लोकप्रिय झालेली बबिता भाभी उर्फ त्रिधा चौधरी.
त्रिधा चौधरीचा व्हिडीओ चर्चेत
त्रिधा काहीना काही कारणाने नेहमी चर्चेत असते. पण ‘आश्रम’ मधील बोल्ड सीनमुळे त्रिधा खूपच चर्चेत आली. संपूर्ण मालिकेत त्रिधा साडीत दिसली असली तरी, तिच्या हॉट स्टाईल आणि बोल्ड लूकमुळे लोकांना ती अभिनेत्री म्हणून नक्कीच आवडू लागली. दरम्यान, आता त्रिधाचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामुळे नक्कीच सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
त्रिधाचा बेबी बंप दाखवतानाचा व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओमध्ये त्रिधा चक्क तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्रिधाचे अजून लग्न झालेले नाही. अशा परिस्थितीत,हा विषय नक्की काय आहे? आणि त्रिधा खरोखरंच प्रेग्नेंट आहे का? हे जाणून घेण्यास चाहते नक्कीच आतुर आहेत. त्रिधाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती सोफ्यावर बसून तिच्या पोटावर हात ठेवताना दिसत आहे. तिच्याकडे पाहून असं दिसत आहे की त्रिधा प्रेग्नेंट आहे , तिचा बेबी बंपही अगदी स्पष्ट दिसतोय.

त्रिधा लग्नाआधीच प्रेग्नेंट?
या व्हिडिओ त्रिधाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘माझ्याकडे एक चांगली बातमी आहे’. अभिनेत्रीची ही पोस्ट पाहिल्यानंतर, युजर्सनी तिचे अद्याप लग्न झालेले नसल्यामुळे विविध प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. पण त्रिधाने हा व्हिडिओ 1 एप्रिल रोजी शेअर केला होता, त्यामुळे काही लोक त्याला एप्रिल फूल प्रँकही म्हणत आहेत.
कुत्र्याचं लहान पिल्लू दत्तक घेतलं
पण अखेर या व्हिडीओ मागचं खरं सत्य समोर आलं आहे. ते म्हणजे खरंतर तिने एक कुत्र्याचं लहान पिल्लू दत्तक घेतले आहे. व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही तासांनी, अभिनेत्रीने तिच्या लहान पिल्लासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, ‘हा एक मुलगा आहे!!!’ ‘सेज’ द माल्टीपूला भेटा”.
दरम्यान त्रिधा तिच्या अभिनय आणि कामापेक्षा तिच्या बोल्ड फोटोशूटसाठी जास्त ओळखली जाते. ही सुंदरी दररोज तिचे हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. ज्यामुळे तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं.मात्र त्रिधा कधीही ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List