रणवीर अलाहाबादीला पासपोर्ट देण्यास नकार
इंडिया गॉट लेटेंट शोमध्ये अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्य करणारा यूटय़ुबर रणवीर अलाहाबादी याला पासपोर्ट देण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. पासपोर्ट जारी करण्याचा आदेश दिला तर त्याचा तपासावर परिणाम होईल, असे म्हणत न्यायालयाने त्याला दोन आठवडय़ांनंतर येण्यास सांगितले. ऍड. अभिनव चंद्रचूड यांनी रणवीर अलाहाबादीची बाजू मांडताना त्याच्या रोजीरोटीवर होणाऱया परिणामाचा हवाला देत पासपोर्ट सादर करण्याच्या अटीत सुधारणा करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List