आधी झोपेच्या गोळ्या दिल्या नंतर शरीराचे 15 तुकडे केले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या
उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरात एका विवाहित तरुणीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची अत्यंत भयंकर पद्धतीने हत्या केली आहे. या प्रकरणी मुस्कान रस्तोगी व प्रियकर साहिल शुक्ला यांना अटक केली आहे.
सौरभ राजपूत याचे मुस्कान रस्तोगीसोबत 2016 मध्ये प्रेमविवाह झाला होता. मुस्कानसोबत जास्त वेळ मिळावा म्हणून सौरभने त्याचा मर्चंट नेव्हीचा जॉब सोडला. तसेच तो तिच्यासोबत विभक्त राहू लागला. 2019 मध्ये त्यांना मूलही झालं. मात्र या दरम्यान सौरभला मुस्कानचे साहिल शुक्ला नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचे समजले. त्यावरून त्यांची भांडणं होऊ लागली. प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं. मात्र नंतर मुलीच्या भविष्यासाठी वेगळं न होता एकत्र राहण्याचा निर्णय सौरभने घेतला. मात्र मुस्कानला वेगळे व्हायचे होते. दरम्यानु सौरभने पैसे कमविण्यासाठी पुन्हा एकदा मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळवली. 2023 मध्ये तो कामासाठी बोटीवर गेला होता.
28 फेब्रुवारीला लेकीचा वाढदिवस असल्याने सौरभ 24 फेब्रुवारीला परत आला. मात्र या दरम्यान मुस्कान आणि साहिल जास्त जवळ आले होते. त्यामुळे त्यांनी कायमचा सौरभचा काटा काढायचे ठरवले. त्यांनी सौरभला जेवणातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर गाढ झोपलेल्या सौरभची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर मृतदेह मार्गी लावण्यासाठी त्यांनी त्याच्या शरीराचे 15 तुकडे केले. मात्र हे तुकडे बाहेर कुठे फेकण्यापेक्षा त्याने सिमेंटच्या गोण्या आणल्या व त्याचे ओले मिश्रण तयार केले. त्यानंतर घऱातील ड्रममध्ये सौरभच्या शरीराचे तुकडे आणि सिमेंट टाकले.
दरम्यान सौरभ फोन उचलत नसल्याने त्याच्या कुटुंबियांना संशय आला. यावेळी मुस्कानने सौरभ मनालीला गेल्याचे सांगितले. कुणाला संशय येऊ नये म्हणून मुस्कान आणि साहिल सौरभचा फोन घेऊन मनालीला गेले व तिथून फोटो काढून त्याच्या सोशल मीडियावर अपलोड करत होते. मात्र सौरभ फोन उचलत नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी मुस्कानला ताब्यात घेतले. त्यानंतर तिने व साहिलने मिळून सौरभची हत्या केल्याचे कबूल केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List