मच्छीमार होळी, धुळवडीच्या सुट्टीवर; मासळी कडाडली; खवय्यांचे झाले वांदे

मच्छीमार होळी, धुळवडीच्या सुट्टीवर; मासळी कडाडली; खवय्यांचे झाले वांदे

रायगडच्या खोल समुद्रातील चविष्ट म्हावरं खवय्यांचा जीव की प्राण! पण सध्या म्हावरं कडाडल्याने खवय्यांचे चांगलेच वांदे झाले आहेत. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खिशाला चाट बसत आहे. मासळीचे हे भाव का कडाडले माहितीये? अहो, आपले मच्छीमार दादा सध्या होळी-धुळवडीच्या सुट्टीवर आहेत. तब्बल आठ-दहा दिवस ते कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करीत असून सध्या मासेमारी बंद ठेवली आहे. त्यामुळे बाजारात आवक घटल्याने मासळीचे भाव गागनाला भिडले. एका पापलेटसाठी तब्बल १४०० रुपये मोजावे लागत असून सुरमई १ हजार, कोळंबी ५०० तर हलवा ५५० वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे खवय्यांनो, जरा सबुरीनं… बुरा न मानो होली था…

होळी, धुळवड, रंगपंचमीचा सण साजरा करण्यासाठी खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटीवरील तांडेल, खलाशी सध्या रजेवर गेले आहेत. यामुळे शेकडो मच्छीमार बोटी करंजा, मोरा, रेवस, मुळेखंड आदी विविध बंदरात नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. पावसाळ्यातील दोन महिन्यांचा कालावधी वगळता वर्षातील दहा महिने खलाशी व तांडेल खोल समुद्रात मासेमारीच्या निमित्ताने कुटुंबापासून दूर असतात. परंतु हे मच्छीमार कुटुंबाबरोबर होळीचा सण साजरा करण्यासाठी माघारी परततात.

काही दिवस तरी मासेमारी बंद राहणार असल्याने होळी सणाच्या आधीपासूनच मासळीची आवक घटली आहे. परिणामी भाव चांगलेच कडाडले असल्याची माहिती वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट फिशरमेन वेल्फेअर असोसिएशनचे संचालक रमेश नाखवा यांनी दैनिक ‘सामना’ शी बोलताना दिली.

 

मासळीचे नाव    आधीचे दर         आताचे दर
पापलेट         ८०० ते १०००           १२०० ते १४००
सुरमई          ५५० ते ६५०           ८५० ते १०००
कोळंबी         ४०० ते ४५०           ४५० ते ५००
रिबनफिश      १२५ ते १५०            १७५ ते २००
हलवा            ४०० ते ४५०           ५०० ते ५५०
माकुळ          ३६० ते ४००            ५५० ते ६००
रावस             ५५० ते ६००           ६५० ते ७००
जिताडा            १०००                  १२००
बांगडा           १२० ते १५०             २००

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘काही लोकांसाठी औरंगजेब महान झालाय…’, नागपूर हिंसाचाराचा विकी कौशलच्या ‘छावा’शी कनेक्शन? ‘काही लोकांसाठी औरंगजेब महान झालाय…’, नागपूर हिंसाचाराचा विकी कौशलच्या ‘छावा’शी कनेक्शन?
औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हातील खुलताबाद येथे आहे. आता औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको, त्याची कबर हटवण्याची मागणी होत आहे. दरम्यान,...
ब्युटी विथ ब्रेन! कोण आहे पंकज त्रिपाठी यांची मुलगी? जी वयाच्या फक्त 18 व्या वर्षी करतेय अभिनयात पदार्पण
अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखा यांचं चांगले संबंध नव्हते… अनेक वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्याने सोडलं मौन
होळीत नको तिथे रंग लावल्यामुळे चर्चेत आलेली आमिर अलीची गर्लफ्रेंड कोण? जाणून घ्या
मुस्लीम असून रमजानमध्ये दारू..; रझा मुराद यांच्या व्हिडीओवर भडकले नेटकरी
हार्दिक पांड्याला नवीन प्रेम सापडल्याने नताशा अस्वस्थ? प्रेम,विश्वासावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत
75 वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाची अजब मागणी, नकार देत म्हणाली, ‘मी पूर्ण थंड पडली कारण…’