Brain Flossing- मानसिक ताणतणावावर उत्तम उपाय आहे ‘ब्रेन फ्लॉसिंग’! वाचा सविस्तर

अलीकडे ब्रेन फ्लॉसिंगबद्दल आपल्या प्रत्येकाच्या कानावर काही ना काही ऐकू येत आहे. काय आहे ब्रेन फ्लॉसिंग हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. सध्याच्या घडीला ब्रेन फ्लॉसिंग हा ट्रेंड टिकटॉकवर खूपच लोकप्रिय आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, आपलं शरीर केवळ थकत नाही. तर मनाचाही थकवा हा रोजच्या जीवनात फार महत्त्वाचा मानला जातो. आपल्यापैकी अनेकजण शारीरिक थकव्यासोबत मानसिक थकव्यालाही सामोरे जात आहेत.
ब्रेन फ्लॉसिंगमुळे चिंता कमी होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होते. त्याचबरोबर आपले लक्ष विचलित होत नाही. मुख्य म्हणजे या ब्रेन फ्लॉसिंग उपायामुळे ताणतणावावर मात करण्याचे बळ आपल्यामध्ये येते. आपला मेंदू या उपायामुळे अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करण्यास सज्ज होतो. म्हणूनच ब्रेन फ्लॉसिंग हे मानसिक आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे.
काय आहेत ब्रेन फ्लॉसिंगचे फायदे
ब्रेन फ्लॉसिंगमुळे आपल्या एकूणच विचारांच्या प्रक्रियेमध्ये सुस्पष्टता निर्माण होते. मानसिक थकवा मोठ्या प्रमाणावर दूर होण्यासही मदत होते. तसेच आपण अधिकाधिक सर्जनशील देखील होतो.
आपले मन गोंधळलेले असते, तेव्हा कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. ब्रेन फ्लॉसचा सराव करून, आपण आपले लक्ष केंद्रित करतो आणि आपली कार्यक्षमत वाढवू शकतो. त्यामुळे कोणतेही काम आपल्या हातून उत्तम पार पडते.
ब्रेन फ्लॉसिंग ताण आणि चिंतेसाठी खूप महत्त्वाचे मानले आहे. दैनंदिन जीवनात आंतरिक शांतीसाठी ब्रेन फ्लॉसिंग हा एक उत्तम पर्याय मानलेला आहे.
ब्रेन फ्लॉसिंग कसे कराल?
ध्यानधारणेचा रोजचा सराव केल्याने मानसिक गोंधळ दूर होण्यास मदत होते. तसेच आपल्या विचारांमध्येही पारदर्शकता आणि सुस्पष्टता निर्माण होते.
आवाजाची थेरपी आपल्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. आवाजाची थेरपी ही आपल्या मज्जासंस्थेला अक्षरशः रीसेट करू शकते. आवाजाच्या थेरपीचे महत्त्व हे खूपच अबाधित आहे. या थेरपीमुळे आपल्या मज्जातंतूना उत्तम खाद्य मिळते.
आपले ठराविक विचार आणि भावना या एखाद्या वहीत मांडणे हा सुद्धा ब्रेन फ्लॉसिंगचाच एक प्रकार मानला जातो. मन मोकळे करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. मनातील विचार कागदावर उतरवल्याने, मनावरील ओझे अक्षरशः झटक्यात कमी होते.
डिजिटल उपकरणांच्या सतत संपर्कात राहिल्याने आपले मेंदू खूप थकतो. अशावेळी आपण जेवणादरम्यान किंवा झोपण्यापूर्वी काही वेळ तंत्रज्ञानापासून दूर राहिल्याने आपल्या मनाला आवश्यक असलेली विश्रांती मिळते.
शारीरिक व्यायाम हा ब्रेन फ्लॉसिंगमधला एक उत्तम पर्याय आहे. व्यायामामुळे केवळ शरीरच नाही तर मनही सुदृढ बनते. व्यायामामुळे एंडोर्फिन बाहेर पडतात, जे मूड सुधारतात आणि तणाव कमी करतात. मानसिक आरोग्यासाठी व्यायाम हा खूपच गरजेचा आहे.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List