नाशिकमध्ये रंगपंचमीला गालबोट; दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या, मृतांपैकी एक अजित पवार गटाचा पदाधिकारी

नाशिकमध्ये रंगपंचमीला गालबोट; दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या, मृतांपैकी एक अजित पवार गटाचा पदाधिकारी

बुधवारी राज्यभरात रंगपंचमी उत्साहात साजरी होत असताना नाशिकमध्ये मात्र या सणाला गालबोट लागले. उपनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या आंबेडकरवाडीमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. उमेश जाधव आणि प्रशांत जाधव अशी मृतांची नावे आहेत. मृतांपैकी उमेश जाधव हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पदाधिकारी होता.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेश हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा शहर उपाध्यक्ष होता. तो आणि त्याचा सख्खा भाऊ प्रशांत हे दोघेही बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गालगत असणाऱ्या आंबेडकरवाडीतील एका सार्वजनिक शौचालयासमोरून जात होते. यावेळी शौचालयाजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी दोघांवर हल्ला केला. हल्लेखोरांनी दोघांवर कोयत्याने सपासप वार केला.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दोघांना प्रतिकारही करता आला नाही. कोयत्याच्या वारामुळे दोघेही जाग्यावरच कोसळले. यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. ही बाब परिसरातील तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी दोघांनाही तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ऐन रंगपंचमीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके रवाना केली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘…तर तुमच्यावरच बुमरँग होईल’, दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया ‘…तर तुमच्यावरच बुमरँग होईल’, दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर...
राज्य सरकारचा शिक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय, आता राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना CBSE अभ्यासक्रम
‘या सगळ्या गोष्टीमागे…’; दिशा सालियन प्रकरणावर थोरातांची पहिली प्रतिक्रिया
“अपने टाइप का लडका देखो”; धनश्री-चहलच्या घटस्फोटानंतर चहलच्या कथित गर्लफ्रेंडचा व्हिडीओ समोर
‘KBC 16’ मुळे 7 महिन्यांत अमिताभ बच्चन मालामाल; शोमधून तब्बल एवढ्या कोटींची कमाई
40 वर्षाच्या अंकिता लोखंडेला थेट आलियाच्या आईच्या रोलसाठी विचारलं, अंकितानेही दिलं सडेतोड उत्तर
हिरवी मिर्ची खाल्ल्यास पिकल्या पानाचा देठ होणार ‘हिरवा’, फायदे जाणून पुरूष आजपासूनच सुरू करतील खाणे