IPL 2025 – KKR च्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादच लोटांगण, कोलकाताने 80 धावांनी केला विजय साजरा
कोलकाताच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादच्या विस्फोटक फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातले. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 200 धावांचा डोंगर उभारला होता. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या हैदराबादची चांगलीच तारांबळ उडाली. कोलकाताने केलेल्या भेदक आणि अचूक माऱ्यापुढे हैदराबादचे फलंदाज हजेरी लावून माघारी परतत होते. कामिंडू मेंडिस (27 धावा) आणि क्लासेन (33 धावा) यांनी खेळात थोडी रंगत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे हैदराबादचा संपूर्ण संघ 120 धावांवर बाद झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List