Sikandar Review: पुन्हा एक फ्लॉप सिनेमा… काय आहे सलमान खानच्या ‘सिंकदर’ची कथा? वाचा रिव्ह्यू

Sikandar Review: पुन्हा एक फ्लॉप सिनेमा… काय आहे सलमान खानच्या ‘सिंकदर’ची कथा? वाचा रिव्ह्यू

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदानाचा ‘सिकंदर’ हा सिनेमा चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘सिकंदर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाचे रेटिंग देखील कमी आहे. आता चित्रपटाची कथा नेमकी काय आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. चला जाणून घेऊया…

सलमान खान गेल्या आठ वर्षांपासून सतत फ्लॉप सिनेमे देताना दिसत आहे. २०१७मध्ये प्रदर्शित झालेला ‘टायगर जिंदा है’ हा सलमानचा शेवटचा हिट सिनेमा होता. त्यानंतर त्याने सतत फ्लॉप सिनेमे दिले आहेत. सर्वजण सलमानच्या एखाद्य हिट सिनेमाची वाट पाहात आहे. चाहत्यांना ‘सिकंदर’ या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या. पण ट्विटर वर रिव्ह्यू पाहाता सिनेमा फ्लॉप होणार असे म्हटले जात आहे. त्यापूर्वी सिनेमाची नेमकी कथा काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

वाचा: ‘सैतानाने मला कधी विवस्त्र केले कळाले नाही’, मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य

काय आहे चित्रपटाची कथा?

‘सिकंदर’ चित्रपटात संजय राजकोट उर्फ ​​सिकंदर (सलमान खान)ची कथा दाखवण्यात आली आहे. एक दिवस सिकंदर हा राज्यमंत्री प्रधान (सत्यराज) यांचा मुलगा अर्जुन प्रधान (प्रतिक बब्बर) याच्याशी भांडते. दुसऱ्याच दिवशी प्रधान सिकंदरला अटक करण्यासाठी त्याच्या घरी इन्स्पेक्टर प्रकाश (किशोर) ला पाठवतो. प्रकाशला जेव्हा राजकोटमध्ये सिंकदरला अटक करण्यासाठी पोहोचतो तेव्हा तेथील लोकांचे सिकंदरवर किती प्रेम आहे हे कळते. तसेच सिकंदरची पत्नी साईश्री राजकोट (रश्मिका मंदान्ना) तिच्या पतीला कसा पाठिंबा देते हे देखील कळते.

सिकंदरचा जीव वाचवताना साईश्रीला तिचा जीव गमवावा लागतो. सिकंदरला कळते की त्याच्या पत्नीने तिच्या मृत्यूनंतर तिचे अवयव दान करण्याचे वचन दिले आहे. डॉक्टरांच्या मदतीने, तो साईश्रीचे अवयव दान केलेल्या तिघांची माहिती मिळवतो आणि तो त्या तिघांना प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेतो. संजय त्या तिघांना भेटायला जातो तेव्हा त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या सगळ्यामागे प्रधान आणि त्याच्या मुलाचा हात असतो. आता प्रधान नेमकं काय करतो? सलमान या सगळ्याला कसा सामोरा जातो हे सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल.

कसा आहे कलाकारांचा अभिनय?

सिकंदर सिनेमात सलमान खानचा अभिनय हा फार वाईट आहे. पत्नीच्या अचानक निधाननंतर पतीला जो धक्का बसतो आणि मानसिकदृष्ट्या तो खचलेला असतो. हे दाखवण्यातही सलमानसा अपयश आले आहे. तसेच अॅक्शन्स सीनमध्ये सलमान दरवेळी उत्सुक असतो. या सिनेमामध्ये अॅक्शन सीनमध्येही सलमानची ऊर्जा पाहाला मिळाली नाही. रश्मिकाने सिकंदरच्या पत्नीची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. पण जेव्हा जेव्हा सलमान आणि रश्मिकाच्या केमिस्ट्रीचा भाग येतो तेव्हा त्या दोघांमध्ये केमिस्ट्रीचा अभाव दिसते. प्रतिक बब्बरने साकरेली भूमिका ठिक ठिक आहे. मुंबईतील टॅक्सी ड्रायव्हरच्या भूमिकेत जतीन सरना दिसत आहे. त्याने एकट्याने प्रेक्षकांना विनोदाने खुर्चीत खिळवून ठेवल्याचे स्पष्ट होत आहे.

सकारात्मक बाबी:

१.⁠ ⁠१५-२० मिनिटे मध्यांतरापूर्वीचे थोडेसे आकर्षक भाग

नकारात्मक बाबी:

१.⁠ ⁠जुनी पटकथा

२.⁠ ⁠खराब दिग्दर्शन

३.⁠ ⁠भयानक परफॉर्मन्स

४.⁠ ⁠अनावश्यक गाणी

५.⁠ ⁠दिशाभूल करणारा टीझर आणि ट्रेलर

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कावळा माणसासारखा बोलायला लागला ! व्हायरल व्हिडीओने नेटकरी हैराण – Video कावळा माणसासारखा बोलायला लागला ! व्हायरल व्हिडीओने नेटकरी हैराण – Video
माणसाची नक्कल करणारे पोपट आपण अनेकदा पाहीले असतील, परंतू कावळा माणसाप्रमाणे बोलताना पाहून नेटकरी हैराण झाले आहेत,हा बोलणारा कावळा सध्या...
“बिपाशाचा नवरा अजूनही मला..”; प्रसिद्ध अभिनेत्रीकडून एक्स बॉयफ्रेंडबद्दल भावना व्यक्त
नवऱ्यासोबत सोनाक्षी सिन्हाचे रोमँटिक फोटो, दोघे चाहत्यांना देतात कपल गोल्स
Kunal kamra Controversy: कुणाल कामराचा शो पाहणे आले अंगाशी, प्रेक्षकांना पोलिसांनी बजावले समन्स
‘बिग बॉस 18’च्या विजेत्यामुळे अभिनेत्रीचा घटस्फोट? 15 वर्षांचा संसार मोडल्याबद्दल म्हणाली..
तब्बल 8 ते 9 वर्षांनी पाकिस्तानी अभिनेत्याची पुन्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री; चाहत्यांनी केला आनंद व्यक्त
ईदच्या दिवशी शाहरुख खानची निराशा, लेक सुहानाचा देखील उतरला चेहरा, असं झालं तरी काय?