Sikandar- ‘सिकंदर’ सपशेल फेल; जाॅनच्या डिप्लोमॅटने मारली बाजी!

Sikandar- ‘सिकंदर’ सपशेल फेल; जाॅनच्या डिप्लोमॅटने मारली बाजी!

सलमान खानच्या तोच तो पणाला कंटाळून अखेर प्रेक्षकांनी सलमान खानकडे पाठ वळवली. असं म्हणतात की, प्रेक्षकांना तुम्ही गृहीत धरु लागलात की तुमचा खेळ खल्लास होतो. सलमान खानच्या बाबतीत हे अगदी तंतोतंत लागू पडते. म्हणूनच ईदला प्रदर्शित झालेला सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणण्यात अपयशी ठरत आहे.

येत्या काही दिवसांमध्ये सिकंदरच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन, अनेक थिएटर्समध्ये सिकंदरचे शो कमी करण्यास सुरुवात केली आहे. सिकंदरची जागा इतर चित्रपट घेत आहेत. सध्याच्या घडीला मुंबईत शो रद्द झाल्याचे कोणतेही उदाहरण निदर्शनास आले नसले तरीही, गर्दी मात्र अगदी तुरळक आहे.

 

सुरत, अहमदाबाद, भोपाळ, इंदूर या ठिकाणी मात्र सिकंदरला न मिळालेल्या प्रतिसादामुळे शोची संख्या कमी करावी लागली आहे. सिंकदरच्या जागी गुजराती चित्रपटांनी घेतली आहे. यामध्ये ‘ऑल द बेस्ट पंड्या’ आणि ‘अंबारो’ हे चित्रपट दाखवले जात आहेत. या दोन्ही गुजराती चित्रपटांना चांगली प्रेक्षकसंख्या मिळत आहे.

मुंबईतील आयनॉक्स रघुलीला येथे, 1 प्रिलपासून रात्री साडेनऊ वाजता होणारा सिकंदरचा शोची जागा गुजराती चित्रपटाने घेतली आहे. सिनेपोलिस सीवूड्स आणि पीव्हीआर ओरियन मॉल पनवेल येथे, सिकंदरचे रात्री 9:40 आणि संध्याकाळी 5:30 वाजताचे शो बंद करण्यात आले आणि त्याऐवजी या मल्याळम चित्रपट लावण्यात आलेला आहे. दक्षिण मुंबईतील एलिट आयनॉक्स नरिमन पॉइंट आणि मेट्रो आयनॉक्स येथे, जॉन अब्राहमचा ‘द डिप्लोमॅट’ हा चित्रपट सिकंदरच्या जागी अनुक्रमे रात्री 8:०० वाजता आणि रात्री 8:30 वाजता प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 5 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 5 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
मेष ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी व्ययात आजचा दिवस – सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे योग आरोग्य – पाठदुखी,...
पालिकेच्या रस्त्याची 2018 कामे रखडली; मुंबईकरांचा यंदाचा पावसाळादेखील खड्ड्यात
अलविदा… मनोज कुमार; लाहोरमध्ये जन्मले पण ‘भारत कुमार’ बनले
चित्रपटसृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन, आजारपणातून मात करत चित्रपटांत काम
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप, पुणेकरांची उग्र निदर्शने; चिल्लर फेकली
‘दीनानाथ’ला आमचे पैसे घ्या, पण उपचार अडवू नका! शिवसेनेचा धर्मादाय सहआयुक्तांना घेराव
साताऱ्यात उद्योगमंत्र्यांवर खोट्या नोटांचा पाऊस