मऊ आणि लुसलुशीत चपात्या बनवण्यासाठी कणीक मळताना या गोष्टींचा आवश्य वापर करा
चपाती ही प्रत्येक घरातील महत्त्वाचा अन्नपदार्थ आहे. अनेक घरांमध्ये दिवसाची सुरुवात ही चपाती खाण्यापासून होते. चहासोबत चपाती आजही अनेकांच्या घरात होते. त्यामुळे चपातीला आपल्या घरांमध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे.
चपाती करताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवणे हे खूप गरजेचे आहे. चपाती करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कणिक मळण्याची. कणिक उत्तम असेल तर, चपातीही उत्तम होते. म्हणूनच कणिक मळताना आपण काही गोष्टींवर लक्ष देणे हे खूप गरजेचे आहे. मऊसुत लुसलुशीत चपाती होण्यासाठी कणिक मळताना आपण हे आवश्यक पदार्थ घालायलाच हवेत.
कणिक मळताना काय घालावे?
मऊ आणि लुसलुशीत चपात्या बनवण्यासाठी कणिक मळताना पीठात मीठ आणि किंचीत साखर घालावी.
कणिक मळताना पीठामध्ये थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा.
कणिक मळताना पीठात एक चमचा तेल घालावे, यामुळे पीठ मऊ होते आणि पोळ्याही वातड होत नाहीत.
कणिक मळल्यानंतर ती ओल्या कापडाने झाकूण ठेवावी. चपाती करण्याआधी किमान १० मिनिटे झाकून ठेवल्यास चपात्या मऊ होतात.
कणिक मळताना, हवा असल्यास थोडासा बेकिंग सोडा घालू शकता. यामुळे देखील चपात्या मऊ आणि लुसलुशीत होतात.
आवडत असल्यास, कणिक मळताना तूप घालून मळावे. तूपाचा एक अनोखा सुवास चपातीमध्ये उतरतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List