Summer Skin Care- उन्हाळ्यात त्वचेला ग्लो येण्यासाठी गरजेचा आहे नारळाच्या दुधाचा फेसपॅक! वाचा सविस्तर
धावपळीच्या या जीवनशैलीमध्ये त्वचेची हेळसांड मोठ्या प्रमाणावर होते. अशावेळी आपण विविध प्रकारची मेकअप उत्पादने वापरण्यास सुरुवात करतो. परंतु या गोष्टी काहीच कामाच्या ठरत नाहीत. त्वचेचे सौंदर्य हे नैसर्गिक घटकांनी वाढवणे हे खूप फायद्याचे ठरते. रासायनिक उत्पादने अधिक प्रमाणात वापरल्याने त्वचेलाही नुकसान होते. अशा परिस्थितीत त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी नारळाचे दूध आणि तांदळाच्या पिठापासून बनवलेले फेस पॅक लावणे हे खूप उत्तम आहे. नारळाचे दूध त्वचेला पोषण देते, तर तांदळाचे पीठ त्वचेची चमक वाढवते आणि डागही दूर करते. त्वचेला उजाळा आणण्यासाठी नारळाचे दूध आणि तांदळाचा फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊया.
नारळाचे दूध आणि तांदळाचा फेस पॅक
साहित्य
1 टीस्पून – तांदळाचे पीठ
2 चमचे – नारळाचे दूध
1 चिमूटभर – हळद
नारळाचे दूध आणि तांदळाचा फेस पॅक कसा बनवाल?
नारळाचे दूध आणि तांदळाचा फेस पॅक बनवण्यासाठी, सर्व साहित्य मिसळून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण चेहरा आणि मानेवर २० मिनिटे लावा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. हा पॅक त्वचेचा रंग वाढवतो आणि त्वचा मऊ करतो.
नारळाचे दूध, तांदळाचे पीठ आणि मधाचा फेस पॅक
साहित्य1 टीस्पून – तांदळाचे पीठ
2 चमचे – नारळाचे दूध
1 टीस्पून – मध
नारळाचे दूध, तांदळाचे पीठ आणि मधाचा फेस पॅक कसा बनवाल?
नारळाचे दूध, तांदळाचे पीठ आणि मधाचा फेस पॅक बनवण्यासाठी, सर्व साहित्य एका भांड्यात ठेवा आणि चांगले मिसळा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर 15 मिनिटे लावा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. हे पॅक त्वचा आतून स्वच्छ करतात आणि त्वचेला चमक देतात.
नारळाचे दूध, तांदळाचे पीठ आणि बेसन
साहित्य1 चमचा – तांदळाचे पीठ
अर्धा चमचा – बेसन
3 टेबलस्पून – नारळाचे दूध
नारळाचे दूध, तांदळाचे पीठ आणि बेसनाचा फेस पॅक कसा बनवाल?
मिश्रण तयार करण्यासाठी नारळाचे दूध, तांदळाचे पीठ आणि बेसन घाला, सर्व साहित्य मिसळा आणि जाड मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर १५ मिनिटे लावा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. या पॅकमुळे डाग हलके होतात आणि मुरुमेही कमी होतात.
हा पॅक लावण्यापूर्वी पॅच टेस्ट न विसरता करा.
(कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List