Sikandar- भाईजानच्या ‘सिंकदर’चा प्रभाव पडला फिका! पहिल्या दिवशीच्या कमाईचा आकडा अपेक्षेपेक्षा खूप कमी!

Sikandar- भाईजानच्या ‘सिंकदर’चा प्रभाव पडला फिका! पहिल्या दिवशीच्या कमाईचा आकडा अपेक्षेपेक्षा खूप कमी!

‘सिंकदर’ पडद्यावर अवतरणार म्हणून जी काही हवा निर्माण झाली होती ती हवा फुस्स झालेली आहे. दस्तुरखुद्द सलमान खान ईदला मोठ्या पडद्यावर अवतरला. परंतु सलमानची क्रेझ मात्र तितकी दिसून आली नाही. त्यामुळेच भाईजानचा ‘सिंकदर’ काही मोठी कामगिरी करु शकला नाही.

 

भाईजानचा ‘सिंकदर’ ठरल्याप्रमाणे ईदच्या दिवशी रिलीज झाला. सलमान खान म्हटल्यावर, त्याच्या फॅन्सने तोबा गर्दी केली. परंतु हा ‘सिंकदर’ मात्र पडद्यावर फिकाच पडला. विकीच्या छावापुढे सिंकदरची कमाई तर कमी होतीच, परंतु पडद्यावरही ‘सिंकदर’ची जादू तितकी चालली नाही. सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत ‘सिकंदर’ची पहिल्या दिवसाची कमाई ही अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती. चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई ही केवळ 26 कोटी इतकीच होती.

‘सिंकदर’ने प्रदर्शनाआधी जी हवा निर्माण केली होती, त्यामानाने हा आकडा खूपच कमी होता. इतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या तुलनेत या चित्रपटाला चांगली कामगिरी करता आली नाही. विकी कौशल अभिनीत ‘छावा’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 31 कोटी रुपयांची कमाई केली होती. सिंकदरला मात्र छावाचा पहिल्या दिवसाचा गल्लाही मागे टाकता आला नाही. मुख्य बाब म्हणजे सलमानचा या आधीचा ब्लॉकबस्टर ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटापेक्षाही सिंकदर मागे पडला. ‘टाइगर जिंदा है’ चित्रपटाने पहिल्या दिवशी 33 कोटी रुपये कमावले होते.

नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट आणि सलमान खान फिल्म्स निर्मित, सिकंदर हा एक अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे ज्यामध्ये अंजिनी धवन, काजल अग्रवाल, सत्यराज आणि शर्मन जोशी यांच्यासारख्या कलाकारांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

VIDEO: सलमान खानच्या चाहत्यांनी कहर केला; थेट थिएटरमध्येच  फोडले फटाके, व्हिडीओ व्हायरल VIDEO: सलमान खानच्या चाहत्यांनी कहर केला; थेट थिएटरमध्येच फोडले फटाके, व्हिडीओ व्हायरल
ईदच्या एक दिवस आधी प्रदर्शित झालेला सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट अनेकांना आवडला आहे. सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांच्या...
Google Pay, युपीआय सेवा जगभरात ठप्प; युजर्सचा उडाला गोंधळ
BCCI ची मोठी घोषणा; वर्षाच्या शेवटी दोन दिग्गज संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार, वेळापत्रक जाहीर
Jalana News लग्नानंतर सहा महिन्यातच सुनेने काढला सासूचा काटा, मात्र शेजाऱ्याने पाहिल्याने व्हावे लागले फरार
पूनम गुप्ता यांची RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती, 3 वर्षांचा असेल कार्यकाळ
Waqf Board Amendment Bill 2025 – तुमचा हेतू जमीन हडपण्याचा, न्याय देण्याचा नाही; अरविंद सावंत यांनी सरकारला धरलं धारेवर
‘विरोधकांनी छातीवर हात ठेवून…’; फडणवीस आक्रमक, वक्फ संशोधन विधेयकावर पहिली प्रतिक्रिया