राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज; काही ठिकाणी दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज; काही ठिकाणी दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

राज्यात उन्हाचे चटके असह्य झाले असताना आता हवामान खात्याने राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाची शक्यता असल्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. या अवकाळी पावसाचा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. यंदा आंब्याचा पहिला मोहर वांझ ठरल्याने आंब्यांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहेत. त्यातच या पावसाने आंब्यांचे उत्पादन आणखी घटण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्याला 1 आणि 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर आठ शहरांना मंगळवार आणि बुधवारी ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवस पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या पावसाने उष्णतेपासून थोडा दिलासा मिळणार आहे. सरासरी तापमानात 5 अंशांची घट होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर उकाड्यात पुन्हा वाढ होणार आहे. एप्रिल ते जूनदरम्यान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील, असाही अंदाज वर्तवला आहे.

हिमालय ते उत्तर हिंदुस्थानात पश्चिमी चक्रवात सक्रिय आहे. तामिळनाडू राज्यातही कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशातील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. हिमालयापासून ते देशाचा ईशान्य भाग, मध्य भाग, मध्य प्रदेश महाराष्ट्र ते दक्षिण भाग असा संपूर्ण देशात वळवाचा प्रभाव 4 एप्रिलपर्यंत राहणार आहे. महाराष्ट्रात 1 ते 2 एप्रिल रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुणे, सातारा, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, गोंदिया या ठिकाणी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई आणि उपनगरे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘विरोधकांनी छातीवर हात ठेवून…’; फडणवीस आक्रमक, वक्फ संशोधन विधेयकावर पहिली प्रतिक्रिया ‘विरोधकांनी छातीवर हात ठेवून…’; फडणवीस आक्रमक, वक्फ संशोधन विधेयकावर पहिली प्रतिक्रिया
लोकसभेत अखेर आज वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आलं आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक...
आमचं फक्त लग्न झालंय पण ती दुसऱ्या पुरुषांसोबत…या अभिनेत्रीच्या नवऱ्याचा गंभीर आरोप
राजघराण्यातील मुलगी, पहिल्याच सिनेमामुळे स्टार… पण MMS मुळे रातोरात करिअर बरबाद
हा देश म्हणजे जेल नाही! संजय राऊतांचे राज्यसभेत तडाखेबंद भाषण
IPL 2025 – पहिलचं षटक गाजवणारे अव्वल 5 गोलंदाज माहितीयेत का? न्यूझीलंडचा खेळाडू आहे पहिल्या क्रमांकावर
सायकलिंग करताना या गोष्टी न विसरता लक्षात ठेवा; तुम्हाला मिळतील अधिक फायदे
Tips to Manage Stress- रोजच्या जीवनातील ताण-तणाव कमी करण्यासाठी हे आहेत महत्त्वाचे पर्याय!