बिबट्याचा पुन्हा हल्ला, 65 वर्षीय वृध्देला अर्धा किमीपर्यंत फरफट नेले
वैजापूर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून बिबट्यांचा हैदोस सुरू आहे. कविटखेडा येथील चिमुकलीवर हल्ल्याची घटना ताजी असतानाच जिरी येथील एका 65 वर्षीय वृद्धेला जवळपास अर्धा किलोमीटर फरपटत नेऊन हल्ला केल्याची घटना घडली. या वृद्धचा चेहरा व हात धडा वेगळा करून बिबट्याने खाल्ल्याचे समोर आले आहे. वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या या हल्ल्यामुळे शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र तरी वन विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहेत.
वैजापूर तालुक्यातील गिरी वळण कविठखेडा अंचलगाव आधी पंचक्रोशीत बिबट्याचा वावर वाढला आहे. आतापर्यंत या बिबट्यांनी अंचलगाव वळण सह इतर ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरावर हल्ला केला. या बिबट्याच्या तोंडी रक्त लागल्याने आता ते नरभक्ष होऊन त्यांनी थेट माणसावर हल्ले सुरू केले आहे.
मागील आठवड्यात कविटखेडा येथील सोनवणे वस्तीवर राहणाऱ्या गायत्री कडलक या सात वर्षीय चिमुकलीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात चिमुकलेला आपला जीव गमवावा लागला. ही घटना ताजी असतानाच आज या बिबट्याने पुन्हा हल्ला केला. जिरे येथे सकाळी सहा वाजता झुंबरबाई माणिकराव मांदडे (65) यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली. शेतवस्तीवरील बाहेरच्या ओट्यावर झोपलेल्या झुंबरबाई यांना पहाटे बिबट्याने वस्तीपासून दूर फरफट नेले. त्यांच्यावर हल्ला करून तोंडचा जभडा तसेत त्यांचा हात खल्ला. त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला. झुंबरबाई माणिकराव मांदडे यांच्या पश्चात त्यांचा मुलगा, 4लेकी, 1 सुन, जावई. नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.
बिबट्याचा बंदोबस्त करा
जिरी वळण आदी परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करा अशी मागणी गेल्या काही दिवसापासून परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने नरभक्ष बिबट्या हा वारंवार हल्ले करत आहे. या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करा अशी मागणी पंचक्रोशीतील सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात हलगर्जीपणा केला तर आगामी काळात मोठे जन आंदोलन उभे करू असा इशारा कविटखेडा येथील ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर साळुंखे यांनी दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List