Ghibli Art- अमिताभ बच्चन यांनाही Ghibli Art ची भूरळ!
सोशल मीडियावर अमिताभ हे कायमच सक्रीय असल्यामुळे, ते कायमच नव्या गोष्टींची दखल घेत असतात. नुकताच Ghibli Art ने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या नव्या आर्टची जादू सर्वसामान्यांपासून ते बाॅलीवूड सर्वांवर दिसून येत आहे. सध्याच्या घडीला अमिताभ बच्चन देखील घिबली ट्रेंडमध्ये सामील झाले, त्यांनी स्वतःचे एडिट्स दाखवले आणि घिबली ट्रेंडबद्दल त्यांनी त्यांचे विचारही व्यक्त केले आहेत.
घिबली या सध्याच्या ट्रेंडबद्दल अमिताभ बच्चन म्हणतात, “…आणि घिबली.. जगावर आक्रमण करतो… संवादाच्या क्षेत्रात वास्तवात.. आणि ‘रील’ बनवताना.. ही आता लोकप्रिय झालेली आणखी एक संकल्पना आहे. जी लक्ष देण्याची मागणी करते..” अमिताभ बच्चन केवळ इतकंच मत व्यक्त करुन थांबले नाहीत. तर त्यांनी त्यांच्या फॅन्स सोबत असलेल्या फोटोंना घिबली आर्टच्या माध्यमातून सादर केले आहेत.
बिग बी यांनी स्वतःला कायम काळासोबत पुढे नेलेले आहे. आजही वयाच्या ८१ व्या वर्षी ते नवीन ट्रेंडस् कडे कायमच कुतूहलाने पाहात आलेले आहेत. केवळ इतकेच नाही तर, ते स्वतःही या ट्रेंडचा भाग होताना दिसत आहेत. सध्याच्या घडीला स्टुडिओ घिबली मुळे बाॅलीवूडही घिबली आर्टच्या जादूने पछाडलेले आहे. परिणीती चोप्रा, कतरिना कैफ-विकी कौशल, अर्जुन कपूर, संजय दत्त आणि इतर अनेक कलाकार घिबली आर्टच्या जादूने प्रभावित झालेले दिसतात.
काय आहे घिबली आर्ट?
घिबलीचा बोलबाला सध्याच्या घडीला खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे. या आर्टचा संबंध हा जपानसोबत जोडला गेलेला आहे. हायाओ मियाझाकी यांच्या स्टुडिओचे नाव घिबली आहे. जपानच्या अॅनिमेशन जगतातील मियाझाकी हे राजा म्हणून ओळखले जातात. घिबली या कलेला जगभरातून मोठ्या प्रमाणात पसंती मिळालेली आहे. ‘स्पिरिटेड अवे’ हा मियाझाकी यांचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट असून, जगभरात २३००० कोटींहून अधिक कमाई केली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List