आम्ही अडकलो नव्हतो, खूप शिकलो आणि शिकवले; अंतराळ मोहिमेबाबत सुनिता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांनी व्यक्त केल्या भावना
अंतराळातील दीर्घ प्रवासानंतर पृथ्वीवर परतलेल्या सुनिता विल्मम्स आणि बूच विल्मोर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सर्व वृत्तांमधून आम्ही अंतराळात अडकल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आम्ही अंतराळात अडकलो नव्हतो, या काळात आम्ही अनेक गोष्टी शिकलो, अंतराळवीरांना अनेक गोष्टी शिकवल्या. तसेच महत्त्वाचे संशोधन केले, असे त्यांनी सांगितले. तसेच अंतराळ प्रवास खूप जोखीमचा असून आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर करत पुढे जाण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अतंराळ मोहिमेबाबतचे मत व्यक्त केले आहे. सद्यस्थितीत अंतराळ उड्डाण करणे कठीण आहे आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःला पुढे नेण्याचा आणि सुधारण्याचा प्रयत्न करणे कठीण आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परत आणण्यात मदत केल्याबद्दल सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि स्पेसएक्सचे मालक एलोन मस्क यांचे आभार मानले. बोईंग स्टारलाइनर अंतराळयानात बिघाड झाल्यानंतर अंतराळात त्यांचा नऊ महिने मुक्काम होता. त्यामुळे काही दिवसांसाठी असलेली ही मोहीम नऊ महिन्यांपर्यंत लांबली होती.
बोईंगमधील बिघाडाबाबत त्यांनी विचारले असता यासाठी आपण कोणलाही दोष देत नाही. तात्रिक बिघाड कोणत्याही कारणाने होऊ शकतो. आम्ही त्यावर मात करत नऊ महिन्यात अंतराळात महत्त्वाचे काम केल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेबाबत आम्ही अंतराळत अडकलो असे अनेकांना वाटते. मात्र, यात फक्त आम्ही नियोजनानुसार घरी परतलो नाही. आमची मोहीम लांबली. याकाळाचा उपयोग आम्ही नवीन शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी केला. तसेच महत्त्वाचे संशोधनही केले, असे विल्मोर यांनी सांगितले.
अंतराळात लहान मोहिमेची योजना आखतानाच मोहीम दीर्घकाळ चालणार आहे, अशाप्रकारे तयारी करण्यात येते,असे विल्यम्स यांनी सांगितले. अंतराळ स्थानकातील देखभाल, तेथील तंत्रज्ञान, विज्ञान, स्पेसवॉक, रोबोटिक्स, आर्म वर्क याबाबत आम्ही अनेक गोष्टी शिकलो. आम्हाला दीर्घ कालावधीसाठी जे काही आवश्यक होते, ते सर्व आम्ही केले, असेही त्या म्हणाल्या. जे काही घडलवे त्यासाठी कोणलाही दोष देणे, योग्य नाही, असे त्या म्हणाल्या. कोणत्याही आकस्मिक संकटासाठी आपण तयार राहण्याची गरज आहे. आपल्याला या क्षेत्रात पुढे जायचे आहे, त्यामुळे याघटनेतून आपण बरेच काही शिकलो आहे. आपल्या चुका, त्रुटी जाणून त्या दूर करूया आणि तंत्रज्ञानाने अधिक प्रगत होत पुढील वाटचाल करूया, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List