डेटिंग अॅपमुळे 6.3 कोटी रुपये गमावले
सध्या डेटिंग अॅपचा सुळसुळाट झाला आहे. पैसे मोजून डेटिंग अॅपवर आलेल्या एका घटस्फोटित व्यक्तीला प्रेमाचा शोध घेणे चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीला महिलेने तब्बल 6.3 कोटी रुपयांना चुना लावला आहे. नोएडा येथे राहणारा व्यक्ती असून काही महिन्यांपूर्वी या व्यक्तीची डेटिंग अॅपवर एका महिलेशी ओळख झाली होती. महिलेने या व्यक्तीला विश्वासात घेत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. तसेच मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले, परंतु गुंतवणुकीच्या नादात या व्यक्तीने एकूण 6.3 कोटी रुपये गमावले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List