महायुती सरकार म्हणजे एप्रिल फुल सरकार! आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

महायुती सरकार म्हणजे एप्रिल फुल सरकार! आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर टीका केली. आज जगभरात एप्रिल फूल डे साजरा होतो, तर आपल्याकडे अच्छे दिन सरकार म्हणून साजारा होतो. निवडणुकीच्या आयोगाच्या आशिर्वादाने स्थापन झालेल्या महायुती सरकारचे नाव एप्रिल फूल सरकार ठेवले पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. या सरकारने दिलेली कोणतीही आश्वासने त्यांनी पाळली नाहीत. तसेच आता मुंबईकरांवर घनकचरा कर नावाने अदानी कर लादण्यात येत आहे, त्याचा सर्वांनी विरोध करावा, असे आवाहनही त्यांनी केले. आम्ही याविरोधात आवाज उठवत असून तीव्र विरोध करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. लाडका भाऊ योजना बंद करण्यात आली आहे. शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांना कर्ज भरावे लागेल, असे सरकार सांगत आहे. एसंशि सरकारने मुंबई खड्डात घातली आहे. तसेच मुंबईवर अदानी कर लादला जाणार असे आम्ही सांगत होतो, त्याची सुरुवात होत आहे. आता शहरातील घन कचऱ्यावरही कर लावण्यात येणार आहे. मुंबई पालिकेचा आणि मुंबईकरांचा विरोध असतानाही देवनार डपींग ग्राऊड अदानीला देण्यात आले होते. आता अदानी समूह ते स्वच्छ करून मागत आहे. त्यासाठी 2.5 ते 3 हजार कोटींचा बोजा मुंबई महापालिकेवर म्हणजे जनतेवर पडणार आहे. मुंबई महापालिका आपल्याकडे होती, तेव्हा असे कोणतेही छुपे कर आपण लावले नव्हते. तसेच आपण 500 चौरस फूटांच्या घरावर मालमत्ता शुल्क माफ केले होते. मात्र, आता एप्रिल फूल सरकार जनतेवर घनकचरा शुल्क लादत आहे. असेअनेक छुपे कर अदानी कर ममुंबईवर लादण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

हे कर लावत आहे, ते दर तीन वर्षांनी वाढत जातात. त्यात आणखी वाढ होणार आहे. ही परिस्थिती मुंबईकरांवर कोणी आणली, हा विचार करण्याची गरज आहे. आपल्याकडे महापालिका असताना 92हजार कोटींच्या सरप्लसमध्ये होती. अनेक सुविधा आपण मोफत दिल्या होत्या. आता हे सरकार मुंबईकरांवर कर लावत आहेत. एसंशि सरकारने मुंबईची लूट केली आहे. जनतेचे पैसे चोरून लाडक्या कंत्राटदारांच्या खिशात टाकण्यात आले आहे. आता जनतेवर कर लादून मुंबईची लूट करण्यात येत आहेस, असेही ते म्हणाले.

घनकचरा कराबाबत 31 मेपर्यंत हरकती सूचना मागवण्यात आल्या आहेत. आपण या घनकचरा शुल्काला कडाडून विरोध केला पाहिजे. हा अदानी कर आहे. अदानीची सेवा करण्यासाठी, भाजपच्या मालकाची, एसंशिच्या मालकाची सेवा करण्यासाठी मुंबईवर हा कर लादला जात आहे. त्याची गरज नाही. मुंबईत अनेक गोष्टींसाठी कर लावला जातो. मात्र, तरीही मुंबईकरांवर हा कर का लावला जात आहे, याची विचारणा करण्याची गरज आहे. कोणतेही शुल्क न लावता हे काम होऊ शकते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

अदानीला सर्व कर माफ करायचे आणि मुंबईवर कर लादायचे, असे सरकारचे धोरण आहे. एसंशि सरकारने मुंबई खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच निवडणुकीआधी रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन केले.मात्र, अद्याप काम सुरू झालेले नाही. ज्या रस्त्यांची कामे झाली आहेत. ती निकृष्ट दर्जाची आहे. या कामातून कंत्रआटदारांचे खिसे भरण्यात आले आहेत. मुंबईत पाण्याची समस्याही गंभीर झाली आहे. महापालिकेकडे असलेली यंत्रणा वापरली तरी मुंबई स्वच्छ होणार आहे. त्यासाठी कोणत्याही कराची गरज नाही. मुंबईकरांवर सर्व बाजूने आर्थिक भार टाकण्यात येत आहे. मुंबईकरांनी हे कर भरायचे कसे, असा सवालही त्यांनी केला. मुंबईकरांकडून पैसे घेण्याआधी अदानी कडूनपैसे घ्यावे, असेही आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चाळीशीत अप्सरा दिसाल, नवरा पुन्हा प्रेमात पडेल, फक्त आठवड्यातून 3 दिवस नारळ पाणी प्या चाळीशीत अप्सरा दिसाल, नवरा पुन्हा प्रेमात पडेल, फक्त आठवड्यातून 3 दिवस नारळ पाणी प्या
उन्हात नारळ पाणी पिण्याची मजा काही औरच असते, पण तुम्हाला माहित आहे का की, हे फक्त तहान भागवण्यासाठी आणि ताजेपणा...
MERC चा ग्राहकांना शॉक, वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती
IPL 2025 – जॉस बटलरची झुंजार अर्धशतकीय खेळी, गुजरातने RCB चा केला 8 विकेटने पराभव
मी जरी डॉक्टर नसलो तरी कोणाच्या मानेचा पट्टा…., एकनाथ शिंदेंचा पुन्हा नाव न घेता ठाकरेंवर हल्लाबोल
छत्रपती शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर राजे होते, त्यांच्या सैन्यात मुस्लीमही होते, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
Mumbai Local – कुर्ला स्टेशनवर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून धूर, प्रवाशांची धावाधाव
लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी दिल्लीला रवाना