दहावी नंतर पुढे काय? जागृती मंच कडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
दहावीनंतर पुढे काय करायचे? कोणत्या क्षेत्रात करीअर करायचे, असे प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना पडतात. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जागृती मंचच्या वतीने गिरगावात जागृती मंचाने करीअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेत विविध क्षेत्रांबाबत माहिती जाणून घेतली.
शिबिरात 25 वर्षे मुलांची मानसिकता, बुद्धिमत्ता, व्यवसाय मार्गदर्शन, करीअर मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांत व विषयावर संशोधन करणारे चेंबूर येथील ग्रोथ सेंटर यांच्या व्याख्याता व समुपदेशक मुग्धा शेटये यांनी तब्बल दोन तास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले व माहिती जाणून घेतली. करीअर मार्गदर्शन कार्यक्रम जागृती मंचाचे अध्यक्ष व शिवसेनेचे उपविभाग प्रमुख राम साळगावकर यांच्या पुढाकाराने घेण्यात आला, तर या कार्यक्रमाची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी जागृती मंचचे सचिव विष्णू कणेराकर यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष सावंत यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक रमाकांत रहाटे, समाजसेवक प्रागजी वाजा हे उपस्थित होते. करीअर मार्गदर्शन शिबीर यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत गावडे, ओमकार साळगावकर, संतोष आकेरकर, अॅड. दीपक आजगेकर, अनिल जाधव, संदीप पाटणकर, जीवन भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List