जेव्हा मनीषाने ब्रेकअपसाठी ऐश्वर्याला ठरवलं जबाबदार, ढसाढसा रडली अभिनेत्री, किस्सा फार कमी लोकांना माहितीये
Manisha Koirala Blamed Aishwarya Rai: 90 च्या दशकात बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींमध्ये असलेले वाद समोर आले आहेत. ज्यानंतर अनेक अभिनेत्रींचा एकमेकांसोबत ३६ चा आकडा आहे. एक काळ असा देखील होता जेव्हा अभिनेत्री मनिषा कोईराला हिने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यावर गंभीर आरोप केले होते. ऐश्वर्या राय हिच्यामुळे माझं ब्रेकअप झालं असं… मनिषा म्हणाली होती. रिपोर्टनुसार, ज्या पुरुषासोबत एश्वर्या आणि मनिषा यांच्या नात्याची चर्चा रंगली तो पुरुष दुसरा तिसरा कोणी नाही तर, राजीव मूलचंदानी आहे. राजीव आणि ऐश्वर्या यांच्या नात्याचा खुलासा खुद्द अभिनेत्री मनीषा कोईराला हिने एका मुलाखतीत केला होता.
तेव्हा मनिषा आणि राजीव यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला होता. तर दुसरीकडे ऐश्वर्या हिच्यासोबत देखील राजीव याच्या नावाची चर्चा रंगली. रिपोर्टनुसार, राजीवने ऐश्वर्या राय हिला लिहिलेली प्रेमपत्रे मनीषाच्या हाती लागली. मात्र, एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले की, ‘बॉम्बे’ सिनेमा पाहिल्यानंतर ऐश्वर्या फोन किंवा पत्र लिहून मनिषा हिचं कौतुक करणार होती. पण तेव्हाच मनिषा हिने स्वतःच्या ब्रेकअपसाठी ऐश्वर्या हिला जबाबदार ठरवलं होतं.
मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाली होती, ‘बॉम्बे’ सिनेमा पाहिल्यानंतर मी मनिषा हिच्या अभिनयाचं कौतुक करणार होती. तेव्हा 1 एप्रिल रोजी राजीव याने मला फोन केला आणि मला सांगितलं आधी न्यूजपेपर वाच… राजीवने मला सांगितलं की मनीषाने दावा केला होता की तिला राजीवने माझ्यासाठी लिहिलेली प्रेमपत्रे मिळाली आहेत. माझा विश्वासच बसत नव्हता! तो खूप मोठा धक्का होता.”
सांगायचं झालं तर, राजीव मूलचंदानी याला मनीषा हिने डेट केलं आहे. मनीषा हिने राजीव मूलचंदानी याच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली देखील दिली आहे. पण ऐश्वर्या हिने कधीही राजीव मूलचंदानी याच्यासोबत असलेल्या नात्याचा स्वीकार केला नाही. यामुळे ऐश्वर्या राय – मनीषा कोईराला वाद देखील झाले होते.
एक काळ असा होता जेव्हा मनिषा कोईराला आणि ऐश्वर्या राय त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होत्या. मनिषा हिचं नाव 12 सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. त्यानंतर अभिनेत्री उद्योजकासोबत लग्न केलं. पण अभिनेत्रीचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 2 वर्षानंतर मनिषा हिचा घटस्फोट झाला.
ऐश्वर्या आज अभिषेक बच्चन याच्यासोबत वैवाहित जीवनाचा आनंद घेत असली तरी, अभिनेत्री तिच्या अफेअर्समुळे कायम चर्चत असते. पण अभिषेक याच्यासोबत लग्न करण्याआधी अभिनेत्रीने अभिनेता सलमान खान आणि विवेक ओबेरॉय याला देखील डेट केलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List