औरंगजेबाच्या कबरीचा वाद अनावश्यक! संघाची भूमिका; ज्यांची श्रद्धा आहे ते कबरीवर जातील
औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यक आहे. औरंगजेबाचा मृत्यू इथे झाला म्हणून त्याची इथे कबर आहे. ज्याची श्रद्धा असेल तो कबरीवर जाईल, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी मांडली आहे.
संघ परिवारातील बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेकडून औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सरकारने ती हटवली नाही, तर ती हटवण्यात येईल, असा इशाराही या दोन्ही संघटनांकडून देण्यात आला आहे. यासंदर्भात संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करत नाही.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता भैयाजी जोशी यांनी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा अनावश्यकपणे उकरून काढला जात असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या कबरीला पुरातत्व खात्याने संरक्षण दिले आहे. त्यामुळे कबर हटवता येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा स्पष्ट केले.
औरंगजेबाचा मृत्यू इथे झाला तर त्याची कबर इथेच असणार. काही लोकांची श्रद्धा असेल तर ते तिथे जातील. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. त्यांनी तर अफजलखानाचीही कबर किल्ल्यावर बनवली आहे. हे भारताच्या उदारतेचे, सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहे, असे भैयाजी जोशी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List