बँकांमधील 102 कोटी रुपयांची किंमतशून्य!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी जाहीर केल्यापासून राज्यातील आठ जिल्हा बँकांमध्ये तब्बल 101.18 कोटी रुपयांची रक्कम पडून आहे. यात चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000च्या नोटा असून त्याचे मूल्य शून्य आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून एप्रिल महिन्यात निकाल लागण्याची अपेक्षा बँकांना आहे. बँकांच्या लेखी ही रक्कम शिल्लक असली तरी आठ वर्षांपासून त्याचा निर्णय लागत नसल्याचे चित्र आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 25.3 कोटी रुपये इतकी रक्कम आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List