लोकशाही मार्ग कुणालाच सोडता येणार नाही, संविधानावर आघात केला तेव्हा इंदिरा गांधींनाही जनतेने पराभूत केले – शरद पवार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली घटनाच अशी लिहिली आहे, ज्यामुळे हिंदुस्थानवर कितीही आघात झाले तरी हा देश एकसंधच राहील. जगातील कोणतीही शक्ती या देशाला दुर्बल करू शकणार नाही. राज्यकर्ते येतील-जातील, पण लोकशाहीचा मार्ग हा कुणालाच सोडता येणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
संविधान गौरव सोहळय़ानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, देशाच्या राजकारणात अनेकदा काही निर्णय घेतले गेले आणि कालांतराने मागे घ्यावे लागले. आणीबाणीचा निर्णय घेतला गेला. तेव्हा लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारे इंदिरा गांधी यांच्यासारखे नेतृत्व आणीबाणीच्या माध्यमातून संविधानावर आघात करतेय, असे जाणवताच जनतेने भूमिका घेतली आणि तेव्हा इंदिरा गांधींनाही पराभवाला सामोरे जावे लागले, असा इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला.
शेजारच्या देशांमध्ये, हुकूमशाही
आज श्रीलंका पाहा, तिथे लष्करशाही आली. पाकिस्तान, चीन बघा, तिथे हुकूमशाही आली. बांगलादेशची परिस्थिती बघा, तिथेही लष्कराचे राज्य आले. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये बदल घडत त्या देशातील घटनेवर आघात होत राहिले, पण हिंदुस्थान हा एकमेव देश आहे जिथे कितीही संकटे आली, कितीही दबाव आला तरीही या देशाच्या संविधानाने देश एकसंध ठेवला. त्यामुळे हा देश एकसंध ठेवण्याचे संपूर्ण श्रेय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे, असे ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List