Beed: बीडच्या कारागृहात कैद्यांचा राडा, वाल्मीक कराडच्या कानाखाली काढला आवाज
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील सहा आरोपी असणार्या बीडच्या कारागृहात आज सोमवारी सकाळी कैद्यांच्या दोन गटामध्ये राडा झाला. परळीच्या बापू आंधळे खून प्रकरणामध्ये कारागृहात असणार्या महादेव गितेने वाल्मीक कराडच्या कानाखाली आवाज काढल्याची माहिती समोर येत आहे. कारागृह प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत राडा नियंत्रणात आणला आणि मोठा अनर्थ टळला.
बीडच्या कारागृहात संतोष देशमुख हत्याकांडातील वाल्मीक कराडसह सूदर्शन घुले आणि इतर चार जण असे सहा जण आहेत. त्याच कारागृहात परळी येथील बापू आंधळे यांच्या खून प्रकरणातील आरोपी देखील येथेच आहेत. बापू आंधळे खून प्रकरणात महादेव गिते यांचे नाव वाल्मीक कराड याने गोवल्याचा आरोप महादेव गिते याने केला होता. आज सकाळी दोन्ही गट समोरासमोर आले आणि वादाला सुरुवात झाली. महादेव गिते याने वाल्मीक कराड याच्या कानाखाली आवाज काढल्याची माहिती समोर येत आहे. कारागृह प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत हा राडा नियंत्रणात आणला. यामुळे मोठा अनर्थ टळला. कारागृह प्रशासनाकडून केवळ वाद झाल्याचे सांगितले जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List