CSK vs RR – राजस्थान रॉयल्सने अटीतटीच्या लढतीत चेन्नईवर केली मात, सीएसकेचा सलग दुसऱ्यांदा पराभव
राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर 6 धावांनी थरारक विजय मिळवला आणि या हंगामातील त्यांचा पहिला विजय नोंदवला आहे. हा सामना गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 9 बाद 182 धावा केल्या, ज्यामध्ये नितीश राणाने 36 चेंडूत 81 धावांची जबरदस्त खेळी खेळली. त्याला संजू सॅमसन आणि रियान पराग यांनीही चांगली साथ दिली.
यातच 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात अडखळली. वानिंदू हसरंगाने आपल्या फिरकी जादूने 4 बळी घेत चेन्नईच्या फलंदाजीला खिंडार पाडले. चेन्नईच्या कर्णधार ऋतुराज गायकवाडने 44 चेंडूत 63 धावा केल्या, तर एमएस धोनीने शेवटच्या षटकात 16 धावांची झटपट खेळी खेळली. पण संदीप शर्माने शेवटच्या षटकात धोनीला बाद करत राजस्थानला विजय मिळवून दिला. चेन्नई 20 षटकांत 5 बाद 176 धावांपर्यंतच मजल मारू शकली. या विजयासह राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2025 मध्ये आपले खाते उघडले, तर चेन्नई सुपर किंग्सला दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List