हरियाणाचे दुहेरी जेतेपद हुकले, किशोर गटात जिंकले, पण किशोरींच्या गटात उपविजेते

हरियाणाचे दुहेरी जेतेपद हुकले, किशोर गटात जिंकले, पण किशोरींच्या गटात उपविजेते

हिंदुस्थानी कबड्डीत आपला दबदबा निर्माण करणार्या हरियाणाचे राष्ट्रीय किशोर कबड्डी स्पर्धेत जेतेपदाचे स्वप्न थोडक्यात हुकले. किशोरी गटात शेवटच्या चढाईपर्यंत रंगलेल्या संघर्षात राजस्थानच्या मुलींनी हरियाणाचा 39-37 असा अवघ्या 2 गुणांनी पराभव करत जेतेपदावर आपला हक्क गाजवला. मात्र किशोरींच्या अपयशानंतर किशोर गटात हरियाणाने हिंदुस्थानी क्रीडा प्राधिकरणाचा (साई) 54-41 असा सहज पराभव करत अजिंक्यपदाला गवसणी घातली.

एक काळ होता की, कबड्डीत महाराष्ट्राचा बोलबाला असायचा. देशाची कबड्डी फक्त महाराष्ट्र चालवायचा, मात्र आता चित्र बदलले आहे. एकीकडे महाराष्ट्रातील क्रीडा संघटक एकमेकांशीच चढाई-पकडींचा खेळ करत असताना हरियाणाच्या किशोर-किशोरी संघांनी अंतिम फेरीत धडक मारून कबड्डीवर आपलेच राज्य असल्याचे दाखवून दिले. 34 व्या राष्ट्रीय स्पर्धेवर हरियाणाच्या खेळाडूंनीच राज्य गाजवले. याच हरियाणाच्या मुलांनी महाराष्ट्राचा उपउपांत्य फेरीतच खेळ खल्लास केला होता. महाराष्ट्रात कबड्डीचे संघ हे गुणवत्तेपेक्षा वशिलेबाजीवरच अधिक निवडले जातात, हेच वारंवारचे कबड्डीचे निकाल स्पष्ट करत आहेत. त्यामुळे जोपर्यंत कबड्डीत गुणवत्तेपेक्षा वशिलेबाजांचीच निवड होत राहाणार, राज्याच्या कबड्डीचा असाच निक्काल लागणार, हे निश्चित आहे.

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची सुमार कामगिरी

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या अंतर्गत राजकारणामुळे ढासळत चालेलली कबड्डीची प्रतिमा आणि वशिलेबाजीने पोखरत जात असलेल्या महाराष्ट्राच्या किशोर आणि किशोरी संघांनाही राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत दारुण अपयशाला सामोरे जावे लागले. महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनाही नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत लाजिरवाण्या पराभवांचे चटके बसले होते, तर आता किशोर आणि किशोरी संघांनीही त्याचीच री ओढली आहे. 34 व्या किशोर आणि किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत किशोर गटात महाराष्ट्राचा उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाकडून 51-40 असा पराभव झाला, तर किशोरी गटात उपउपांत्यपूर्व फेरीतच उत्तर प्रदेशने 52-33 असे सहज आव्हान मोडीत काढले.

पुरुष आणि महिलांच्या संघांच्या निराशाजनक कामगिरीनंतर किशोर संघांकडून राज्याला फार अपेक्षा होत्या, पण या संघांनीही घोर निराशा केली. कबड्डीत उत्तरेकडील राज्यांपुढे महाराष्ट्राचे संघ टिकत नसल्याचे पुन्हा एकदा दिसले. अत्यंत चुरशीच्या उपांत्यपूर्व सामन्यात हरियाणासमोर महाराष्ट्राचा बचाव आज अगदीच दुबळा ठरला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ बोर्डाची संपत्ती तुमच्या पप्पाची जहागीर नाही, काय म्हणाले की इम्तियाज जलील वक्फ बोर्डाची संपत्ती तुमच्या पप्पाची जहागीर नाही, काय म्हणाले की इम्तियाज जलील
रमजान ईदच्या एक दिवस आधी बीडमधील एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.यावर आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी...
मधूर आवाजासाठी ‘ही’ प्रसिद्ध गायिका पिते ‘स्पर्म कॉकटेल’, ऐकून इंडस्ट्री हादरली
Virat Kohli – 2027 चा वर्ल्ड कप खेळणार? विराटने निवृत्तीवर केलं मोठं विधान
Waqf Amendment Bill – NDA ची उद्या अग्निपरीक्षा! भाजप, काँग्रेसने खासदारांना बजावला व्हिप; इंडिया आघाडीने बोलावली महत्त्वाची बैठक
लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या… कुणाल कामराने शेअर केली पोस्ट
Jalna News – जालना जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; सोसाट्याचा वार्‍यासह पावसाची शक्यता, दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
Ratnagiri Accident चाफे येथे अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाने ट्रक पेटवला