म्यानमारमध्ये पुन्हा भूकंप; अनेकजण अजूनही बेपत्ता कुजलेल्या मृतदेहांमुळे दुर्गंधी; नातेवाईकांची शोधाशोध सुरूच

म्यानमारमध्ये पुन्हा भूकंप; अनेकजण अजूनही बेपत्ता कुजलेल्या मृतदेहांमुळे दुर्गंधी; नातेवाईकांची शोधाशोध सुरूच

म्यानमार आज पुन्हा एकदा 5.1 रिश्टर स्केलच्या भूपंपाच्या धक्क्यांनी हादरले. गेल्या तीन दिवसांत पाचहून अधिक भूपंपाचे धक्के बसले असून थायलंडमधील स्थितीही भयंकर आहे. म्यानमारमध्ये इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबले गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतदेह कुजू लागले असून सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. अनेक नागरिक आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी स्वतः हाताने ढिगारा उपसण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र जागोजागी दिसत आहे.

म्यानमारमधील आतापर्यंत तब्बल 1 हजार 644 जणांचा मृत्यू झाला असून 3 हजार 408 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत, तर 139 जण बेपत्ता आहेत.

हिंदुस्थानकडून 40 टनांची मदत

हिंदुस्थानी नौदलाच्या ‘आयएनएस सातपुडा’ आणि ‘आयएनएस सावित्री’ या युद्धनौकांच्या माध्यमातून ‘ऑपरेशन ब्रह्मा’ राबवण्यात आले. त्याअंतर्गत भूपंपग्रस्तांसाठी 40 टन रिलीफ सामग्रीची मदत देण्यात आली. याशिवाय 118 सदस्यीय फिल्ड हॉस्पिटल युनिटदेखील म्यानमारच्या मंडालय येथे पोहोचले. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी म्यानमारला 43 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली. तर रशियाच्या आणीबाणी मंत्रालयाने 120 बचाव पथके आणि दोन विमानांतून मदतसामग्री पाठवली. चीननेदेखील बचाव पथके पाठवली आहेत.

हिमाचल प्रदेशात भूस्खलन; सहा जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातील कुलू जिह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ मणिकर्ण गुरुद्वाराजवळ भूस्खलन होऊन सहा जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गुरुद्वाराजवळ एक झाड कोसळल्याने सहा जणांना जीव गमवावा लागला.

टोंगा येथे 7.1 तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा

पॅसिफिक महासागरातील टोंगा बेटांवर आज 7.1 रिश्टर स्केलचे भूपंपाचे धक्के जाणवले. या भागात त्सुनामीचा इशाराही जारी करण्यात आल्याची माहिती ‘यूएस जिओलॉजिकल सर्व्हे’ने दिली आहे. टोंगाच्या मुख्य बेटापासून उत्तर पूर्वेला एक हजार किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते. भूकंपाच्या केंद्रापासून 300 किलोमीटर अंतरावरील किनारपट्टीवर धोकादायक लाटांचा परिणाम दिसू शकतो असे सांगण्यात आले आहे. भूकंपानंतर झालेल्या नुकसानीची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भारत सरकारशी पंगा घेऊन खटला जिंकणारे एकमेव अभिनेते; सत्तेच्या तोंडावर नाकारली चित्रपटाची ऑफर भारत सरकारशी पंगा घेऊन खटला जिंकणारे एकमेव अभिनेते; सत्तेच्या तोंडावर नाकारली चित्रपटाची ऑफर
भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार आले आणि गेले, परंतु दिग्ग्ज अभिनेते मनोज कुमार यांच्यासारखं दुसरं कोणी नव्हतं. हिंदी सिनेसृष्टीत अनेक हिट...
मनोज कुमार यांचे गाजलेले ‘5’ सिनेमे, मोडले होते सर्व रेकॉर्ड
भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या मनोज कुमार यांचा सुपरस्टारपर्यंतचा प्रवास
सागर कारंडेंना इन्स्टाग्रामवर लाईक्स मिळवणं पडलं महागात, 61 लाखांची फसवणूक, काय आहे प्रकरण?
गावठी कट्टे, जिवंत काडतुसांसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेवगाव पोलिसांची कारवाई; आठ आरोपी गजाआड
वादळी पावसाने पुण्याला झोडपले! झाडे पडली, रस्त्यांवर पाणी, वाहतूककोंडी
डोंबिवली-ठाणे प्रवास धोक्याचा; कोपर-दिवा दरम्यान लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू