कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर
कॉमेडियन कुणाल कामरा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणे केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पण कुणाल इथेच थांबला नाही. त्याने हा वाद सुरु असताना ‘हम होंगे कंगाल…’ हे आणखी एक गाणे प्रदर्शित केले. कुणाल कामराने या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी सर्वजण करत आहेत. या प्रकरणी कामरावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता त्याला अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यात आला आहे.
कुणाल कामराला ७ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ३१ मार्च रोजी कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे. कुणाल कामराला ७ एप्रिल पर्यंत अटकपूर्व जामीन मद्रास हायकोर्टाकडून मंजूर करण्यात आला आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List