Manoj Kumar: ओसामा बिन लादेनच्या हत्येची जागा आणि ‘त्या’ जागेसोबत मनोज कुमार यांचं खास कनेक्शन
Manoj Kumar: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. वयाच्या 87 व्या वर्षी मनोज कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात मनोज कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनानंतर हिंदी सिनेविश्वातील त्यांच्या योगदाला विसरलं जावू शकत नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, मनोज कुमार यांचं खरं नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असं होतं. पण दिलीप कुमार यांचे मोठे चाहते असल्यामुळे त्यांनी स्वतःचं नाव बदललं.
सांगायचं झालं तर, मनोज कुमार यांनी स्वतःला फक्त अभिनयापर्यंत मर्यादित ठेवलं नाही. मनोज कुमार यांनी अनेक सिनेमांचं दिग्दर्शन केलं. आजही मनोज कुमार यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहतात. ‘क्रांती’ हा मनोज कुमार यांच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहे.
‘क्रांती’ सिनेमाद्वारे त्यांनी लोकांमध्ये देशभक्तीची लाट निर्माण केली. मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतातील (आताचा खैबर पख्तूनख्वा) शहर अबोटाबाद येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला.
मनोज कुमार यांचं पाकिस्तान कनेक्शन
ज्या ठिकाणी कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला रात्रीच्या अंधारात अमेरिकन सैनिकांनी मारलं होतं त्याच ठिकाणी मनोज कुमार यांचा जन्म झाला होता हे फार कमी लोकांना माहीत आहे. फाळणीपूर्वी ही जागा भारताचाच एक भाग होती.
भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा मनोज कुमार यांना वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी जलियाला शेरखान येथून दिल्लीत यावं लागलं. त्याच काळात ज्येष्ठ अभिनेत्याचं कुटुंब किंग्सवे कॅम्पमध्ये निर्वासित म्हणून राहत होते, काही काळानंतर तेही दिल्लीच्या जुन्या राजेंद्र नगर भागात आले.
मनोज कुमार यांचे सिनेमे
मनोज कुमार यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत येण्याचा निर्णय घेतला. त्यांचा पहिला सिनेमा ‘फॅशन’ 1957 साली प्रदर्शित झाला. त्यांच्या पहिल्याच सिनेमात त्यांनी ते 80 वर्षाच्या वृद्धाची भूमिका साकारली होती.
त्यानंतर मनोज कुमार यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. कुमार ‘हरियाली और रास्ता’, ‘दस नंबरी’, ‘क्रांती’, ‘रोटी कपडा मकान’, ‘पूरब और पश्चिम’ , ‘उपकार’ यांसारख्या अनेक सिनेमांध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List