मनोज कुमार यांचे गाजलेले ‘5’ सिनेमे, मोडले होते सर्व रेकॉर्ड
अभिनेते मनोज कुमार स्टारर 'दस नंबरी' सिनेमा 1976 मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमात मनोज कुमार यांच्यासोबत अभिनेत्री हेमा मालिनी आणि दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांनी देखील मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमाने भारतात 14.71 कोटींची कमाई केली होती.
'क्रांती' सिनेमाने देखील चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. सिनेमा 1981 मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमात मनोज कुमार यांच्यासोबत दिलीप कुमार, शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी आणि परवीन बॉबी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमा 3.1 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला होता. तर सिनेमाने भारतात 10 कोटी तर जगभरात 16 कोटींची कमाई केली.
1974 प्रदर्शित झालेल्या मनोज कुमार यांच्या 'रोटी कपडा मकान' सिनेमाने देखील बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. 1974 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमाला त्या वर्षातील ऑट टाईम ब्लॉकबास्टर सिनेमा म्हणून घोषित केलं होतं. सिनेमाने भारतात 5.25 कोटींची कमाई केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List