आदिवासी विभागात 114 कोटींचा गणवेश खरेदी घोटाळा, उपमुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

आदिवासी विभागात 114 कोटींचा गणवेश खरेदी घोटाळा, उपमुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

आदिवासी विभागातील 114 कोटींच्या गणवेश खरेदीत भ्रष्टाचार प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

विधान परिषदेत सदस्य एकनाथ खडसे आणि चंद्रकांत रघुवंशी यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना गणवेश खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता तसेच आरोग्य, आदिवासी, परिवहन, पीडब्ल्यूडी विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचारावरून सरकारला जाब विचारला. ते म्हणाले, आदिवासी विकास विभागात मागील महिन्यात 114 कोटींचे गणवेश खरेदी झाली. ही सगळी खरेदी आवश्यक नसताना झाली. एक कोटीपेक्षा अधिक रकमेची खरेदी दर करारावर न करता रीतसर निविदा प्रक्रिया राबवूनच केली जावी. या सरकारच्या आदेशाला फाटा देत आदिवासी विकास विभागाच्या वतीने तब्बल 114 कोटींची गणवेश आणि नाइट ड्रेस खरेदी दर करारावर करण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यातील सुमारे 72 कोटींची देयके पुरवठादार संस्थेला अदाही करण्यात आली. या खरेदीतील भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी खडसे यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज ठाकरेंना कळकळीचं आवाहन, तर अजितदादांकडे राजीनाम्याची मागणी; संजय राऊत यांची टोलेबाजी काय? राज ठाकरेंना कळकळीचं आवाहन, तर अजितदादांकडे राजीनाम्याची मागणी; संजय राऊत यांची टोलेबाजी काय?
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज राज्यातील दोन नेत्यांना लक्ष केलं आहे. मनसेचा आज गुढीपाडव्या निमित्ताने मेळावा आहे. या...
‘हिंदू वाचणार नाही जर…’, मिथुन चक्रवर्तींचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, नक्की काय आहे प्रकरण?
कुणाल कामराविरोधातील 3 गुन्हे मुंबई पोलिसांकडे वर्ग; एकनाथ शिंदेंवरील गाणं भोवलं
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले
मोबाईल चोर भिवंडीत…, अभिनेत्याचा 2 लाखांचा फोन चोरी, ‘तो’ फोटो पोस्ट करत म्हणाला…
‘मनाई असताना हॉटेल रुममध्ये सिगारेट्स..’; नेहा कक्करचा आयोजकांकडून पर्दाफाश, शेअर केला व्हिडीओ
तमन्नासोबतच्या ब्रेकअपनंतर अखेर विजयने सोडलं मौन; म्हणाला “नातं आईस्क्रीमसारखं..”