मोदींचा प्रवास सूर्योदयापासून सूर्यास्ताकडे सुरू आहे; पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यावर विजय वडेट्टीवार यांची टीका

मोदींचा प्रवास सूर्योदयापासून सूर्यास्ताकडे सुरू आहे; पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यावर विजय वडेट्टीवार यांची टीका

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या (RSS) स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमासाठी नागपूरच्या संघ मुख्यालयात येत आहेत. संघाचा इतिहास हा विभाजनाचा राहिला आहे. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहत असल्याने त्यांचा प्रवास सूर्योदयाकडून सूर्यास्ताकडे होत असल्याची टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

दोन समाजांमध्ये दरी निर्माण करणारा संघाचा प्रवास आहे. संघाची भूमिका परिस्थितीनुसार बदलली आहे. ते काही काळ मुस्लिम लीगसोबतही होते. आता संघाला 100 वर्षे पूर्ण होत असल्याच्या कार्यक्रमाला पंतप्रधान येणार आहेत. ते अनेक वर्षांनी नागपूरमध्ये या कार्यक्रमासाठी येत आहेत. त्यामुळे सूर्योदयाकडून सूर्यास्ताकडे त्यांचा प्रवास सुरू असल्याचे दिसते. मोदी आणि त्यांच्या पक्षाला संघ कोठे ठेवणार, याची चर्चा यावेळी बैठकीत होऊ शकते, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला. पंतप्रधान झाल्यानंतर एवढ्या वर्षांनी ते संघ मुख्यालयात येत आहेत. त्यामुळे पक्षाच्या विजयात मोदी यांचा चेहरा नसून संघाची शक्ती आहे, हे मोदी यांना पटले असावे, म्हणूनच ते येत असतील, असेही वडेट्टीवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिर्डी विमानतळावर नाईट लॅण्डिंग सुरू! शिर्डी विमानतळावर नाईट लॅण्डिंग सुरू!
शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक येतात. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू केले. मात्र, ‘नाईट लॅण्डिंग’ची सुविधा नव्हती. अखेर...
खुशखबर! मध्यमवर्गाचे स्वप्न साकार होणार, मुंबईत वर्षभरात म्हाडाची 5 हजार 199 घरांची लॉटरी
अमेरिकेत टेस्लाविरोधात लोक रस्त्यावर
रेडी रेकनर वाढला घरे महागली! मुंबईत 3.39 तर ठाण्यात 6.69 टक्के दरवाढ
एकाच दिवशी 183 जीआर… अल्पसंख्याक संस्थांवर खैरात, आर्थिक वर्ष संपताना तिजोरी उघडली
मी जिथे राहत नाही तिथे मला काय शोधताय? कामराचा पोलिसांना चिमटा
बँकांमधील 102 कोटी रुपयांची किंमतशून्य!