IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन, देवदर्शनासाठी गेले असता काळाचा घाला
आयपीएस सुधाकर पठारे यांचं कार अपघातात निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पठारे ज्या कारमधून प्रवास करत होते त्या कारची ट्रकसोबत धडक होऊन हा अपघात झाला, असं सांगण्यात येत आहे. सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी होते.
मुंबई पोलिसमध्ये पोर्ट झोनमध्ये सुधाकर पठारे चे डीसीपी म्हणून कार्यरत होते. ट्रेनिंगसाठी ते हैदराबादमध्ये गेले होते. येथे येथे ते त्यांच्या एका नातेवाईकासह ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात होते. याच वेळी हा अपघात झाला. या अपघातात सुधाकर पठारे यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List