विमानतळावर सापडलेल्या मृत अर्भकाची आई अल्पवयीन, पोलिसांकडून पोक्सोअंतर्गत तरुणावर गुन्हा दाखल
मुंबई विमातळावर एका नवजात अर्भकाचा मृतदेह आढळला होता. या बाळाची आई एक 16 वर्षाची मुलगी असल्याचे समोर आले आहे. आपल्या मुलीचा गर्भपात झाल्याचा दावा मुलीच्या आईने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एक 16 वर्षाची कॉलेजची विद्यार्थिनी आपल्या आईसोबत रांचीला जात होती. पण विमानतळावरच तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. या मुलीने शौचालयातच बाळाला जन्म दिला. आपल्या मुलीचा गर्भपात झाला आहे त्यामुळे तिने बाळाचा मृतदेह कचऱ्याच्या कुंडीत टाकल्याचे तिच्या आईने सांगितले. कचऱ्याच्या डब्यात टाकलेला मृतदेह अर्भकाचा होता की भ्रूण होतं याचा तपास पोलीस करत आहेत. या बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून सहार पोलीस स्थानकात या संदर्भात केस रजिस्टर करण्यात आली आहे.
मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी मुलीच्या प्रियकराविरोधीत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पोस्को अंतर्गत कारवाई केली आहे.
आपण गरोदर आहोत याची कल्पना मुलीला होती, तसेच आईलाही याबाबत माहिती होती. दोन दिवसांपूर्वी आपण पडल्याचे मुलीने पोलिसांनी सांगितले. विमानतळावर आल्यावर प्रसूतीवेदना सुरू झाल्याचे तिने सांगितले. आपली तब्येत आता बरी असल्याचे मुलीने सांगितले. पण मुलीची वैद्यकीय चाचणी करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलगी आणि तिच्या आईची चौकशी झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List