गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

चैत्र गुढीपाडवा व मराठी नववर्षाप्रारंभ निमित्त आज (रविवार) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या मुळे श्रींचा गाभारा मनमोहक दिसत आहे. सजावटीसाठी शेवंती 200 किलो, अष्टर 80 किलो, गोंडा 150 किलो, गुलाब 100 गड्डी, जिप्सी 10 गड्डी या फुलांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

सदरची सजावट विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील रा. रांजणगाव महागणपती यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत केली असून, सजावटीचे काम श्री फ्लॉवर्स, पुणे यांनी केले आहे. यासाठी सुमारे 12 कामगारांनी परिश्रम घेतले.

हिंदू नववर्षा निमित्त भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मंदिर समिती मार्फत पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, भाविकांची गर्दी विचारात घेऊन भाविकांचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने ऑनलाइन दर्शन पास बुकिंग व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. तसेच व्हीआयपी दर्शनावर निर्बंध, पुजेची संख्या कमी करणे व इतर अनुषंगिक उपाययोजना करण्यात समिती मार्फत करण्यात आल्या आहेत.

प्रत्येक वर्षी महत्त्वाचे सण उत्सव, खास दिवस या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास, सजावट केली जाते. हिंदू नवीवर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजले असून, मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याने, विठुरायाचे सावळे रूप अधिकच खुलून दिसत आहे. हिंदू नव वर्षाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने व्हावी यासाठी हजारो भाविक श्री क्षेत्र पंढरपूरात दाखल झालेले आहेत. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शन रांगेत गर्दी केली असून, विठ्ठल रुक्मिणीमातेच्या नाम गजराने परिसर दुमदुमून गेला आहे. या सजावटीमुळे विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मुर्तीसह गाभारा पाहून देखील भाविक अधिक समाधानी होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

MNS : राज ठाकरेंच्या आदेशानंतर कार्यकर्ते आक्रमक, बँकेतील इंग्रजी- हिंदी भाषिक फलक उतरवले… MNS : राज ठाकरेंच्या आदेशानंतर कार्यकर्ते आक्रमक, बँकेतील इंग्रजी- हिंदी भाषिक फलक उतरवले…
महाराष्ट्रात, मुंबईत कामासाठी रोज लाखो लोकं येत असतात. मराठी ही महाराष्ट्राची आणि मुंबईची मुख्य भाषा आहे. जैसा देश वैसा भेस...
Sanjay Raut : कोणाचा बाप? ‘त्या’ उत्तरावर संजय राऊत यांची थेट प्रतिक्रिया
MNS : आता L&T च्या या गार्डची ‘मराठी गया तेल लगाने’ म्हणण्याची हिम्मत होणार नाही, हा VIDEO बघा
आमिरच्या आयुष्यात आलेली ही सुंदरी कोण? एक हाक देताच त्याच्याजवळ धावत आली
‘तुझ्या लेकीच्या वयाची आहे, थोडी तरी…’, रश्मिकासोबत सलमान खानने केला असा प्रकार, भडकले चाहते
‘तारक मेहता..’मधील दयाबेनच्या भूमिकेसाठी ‘या’ मराठी अभिनेत्रीची निवड? दिली प्रतिक्रिया
सलमानची शानदार ईद पार्टी,बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी; सलमानच्या कथित गर्लफ्रेंडचीही उपस्थिती