चालत्या ई-रिक्षाच्या छतावर रील बनवणे महागात पडले, तोल जाऊन पडल्याने इसमाचा मृत्यू

चालत्या ई-रिक्षाच्या छतावर रील बनवणे महागात पडले, तोल जाऊन पडल्याने इसमाचा मृत्यू

सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी माणसं काय करतील याचा नेम नाही. मात्र त्यांचा हाच नको तो प्रयत्न कधी कधी त्यांच्या जीवावर बेततो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात समोर आली आहे. चालत्या ई-रिक्षाच्या छतावर नाचत रील्स बनवताना तोल जाऊन खाली पडल्याने एका इसमाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गाझीपूरमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली.

चंद्रशेखर रावत (55) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो पोस्टमार्टम हाऊसमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी होता. गुरुवारी रात्री तो डान्स रील बनवण्यासाठी ई-रिक्षाच्या छतावर चढला. यादरम्यान चालकाने गाडी सुरू केली. त्याचा पाय कॅरिअरमध्ये अडकला आणि तो तोल जाऊन जमिनीवर पडला.

उपस्थित लोकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फ्रेश होण्यासाठी अजित पवारांची पोलीस ठाण्यात धाव, खोपोलीच्या शासकीय विश्रामगृहाला टाळे फ्रेश होण्यासाठी अजित पवारांची पोलीस ठाण्यात धाव, खोपोलीच्या शासकीय विश्रामगृहाला टाळे
मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार फ्रेश होण्यासाठी खोपोली विश्रामगृहात गेले. मात्र हे विश्रामगृह गेल्या दहा वर्षांपासून बंद असल्यामुळे...
आम्ही अडकलो नव्हतो, खूप शिकलो आणि शिकवले; अंतराळ मोहिमेबाबत सुनिता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांनी व्यक्त केल्या भावना
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 1 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
शिर्डी विमानतळावर नाईट लॅण्डिंग सुरू!
खुशखबर! मध्यमवर्गाचे स्वप्न साकार होणार, मुंबईत वर्षभरात म्हाडाची 5 हजार 199 घरांची लॉटरी
अमेरिकेत टेस्लाविरोधात लोक रस्त्यावर
रेडी रेकनर वाढला घरे महागली! मुंबईत 3.39 तर ठाण्यात 6.69 टक्के दरवाढ