मस्क यांच्या स्टारलिंकसमोर सरकारची अट

मस्क यांच्या स्टारलिंकसमोर सरकारची अट

अमेरिकेचे उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकची एन्ट्री हिंदुस्थानात लवकरच होणार आहे, परंतु त्याआधीच केंद्र सरकारने त्यांच्यासमोर हिंदुस्थानात एक कंट्रोल सेंटर उभारावे लागेल, अशी अट ठेवली आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि टेलिकम्युनिकेशनची सेवा खंडित किंवा बंद करण्यासाठी याचा वापर करता येईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. सॅटेलाईट परवान्यासाठी स्टारलिंकचा अर्ज सध्या अंतिम टप्प्यात आहे. कंपनीचे मार्केटिंग आणि नेटवर्क वाढवण्यासाठी रिलायन्स जिओ आणि एअरटेलसोबत स्टारलिंकने नुकताच करार केला आहे. इंटरनेट नेटवर्कसाठी कंट्रोल सेंटर असणे गरजेचे आहे. देशात ज्या भागात कायदा-सुव्यवस्था बिघडली, त्या भागातील कम्युनिकेशन सेवा तात्काळ खंडित करता येऊ शकते. स्टारलिंकचे मुख्यालय हे अमेरिकेत आहे. त्यामुळे भविष्यात अशी वेळ आल्यास अमेरिकेत जाऊन दार ठोठावण्याची वेळ येऊ नये, यासाठी एक कंट्रोल सेंटर असणे गरजेचे आहे, असे हिंदुस्थानने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘शिरसाट यांच्याबद्दल मला…सरकारचा चेहराच उघडा करून टाकला…,’ काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ‘शिरसाट यांच्याबद्दल मला…सरकारचा चेहराच उघडा करून टाकला…,’ काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
एक विधेयक येतंय, महाराष्ट्र सुरक्षा कायदा असं काहीतरी बकवास नाव दिलेलं आहे. आता सरकारला महाराष्ट्रातला विद्रोह बंद करून टाकायचा आहे....
‘खोक्या भाऊ माझ्यासाठी चांगलाच’, …अन् करुणा शर्मांनी सांगितला सतीश भोसलेचा तो किस्सा
महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींची फसवणूक; शिवसेना महिला आघाडीच्या वतीने प्रशासनाला निवेदने
कानिफनाथांच्या जयघोषात मढीत होळी उत्सव
जिल्हा बँकेचे बड्या नेत्यांच्या कारखान्यांनी 550 कोटी थकवले; सांगलीतील केन, अॅग्रो, वसंतदादा, महांकाली, माणगंगा कारखान्यांचा समावेश
अहिल्यानगरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु; 99 गावांची 26 मार्च रोजी प्रभागनिहाय अंतिम यादी प्रसिद्ध होणार
इंडसइंड बँकेचे काय होणार? खातेदारांची चिंता वाढली; RBI ने दिली मोठी माहिती