साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 30 मार्च 2025 ते शनिवार 5 एप्रिल 2025

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 30 मार्च 2025 ते शनिवार 5 एप्रिल 2025

>> नीलिमा प्रधान

मेष – निर्णयाची घाई नको

कर्क राशीत मंगळ, चंद्र गुरू युती. गुढीपाडवा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन नव्या दिशेने, उत्साहाने कार्याला सुरूवात कराल. चौफेर सावध रहा. प्रकृतीची काळजी घेऊन दगदग करा. धंद्यात निर्णयाची घाई नको. परिचय मोहात टाकणारा असेल. फसगत टाळा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखाल. विचारपूर्वक वक्तव्य करा. शुभ दि. 1, 2 

वृषभ – धंद्यात उन्नती होईल

वृषभेच्या पराक्रमात मंगळ, सूर्य चंद्र लाभयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला कामे वाढतील. तुमच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. नोकरीत उत्तम संधी मिळेल. उत्साह वाढवणारी घटना घडेल. धंद्यात उन्नती होईल. वसुली करा. घर, वाहन खरेदी-विक्रीत लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आत्मविश्वासात भर पडेल. शुभ दि. 4, 5 

मिथुन – महत्त्वाचे मुद्दे मांडाल

मिथुनेच्या धनस्थानात मंगळ, चंद्र बुध लाभयोग. यांत्रिक बिघाडावर खर्च होईल. अनेक कठीण कामे करता येतील. ओळखीचा उपयोग होईल. प्रेरणा मिळेल. कला, साहित्यात कल्पनाशक्तीला चालना मिळेल. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे मुद्दे मांडता येतील. नवीन ओळख महत्त्वाची ठरेल. शुभ दि. 30, 4 

कर्क – महत्त्वाची कामे करा

स्वराशीत मंगळ राश्यांतर, चंद्र, बुध लाभयोग. सप्ताहाच्या सुरूवातीलाच महत्त्वाची कामे करा. गुढीपाडवा विशेष यश देणारा, उत्साह वाढवणारा असेल. परदेशात जाण्याची संधी. नोकरी धंद्याला कलाटणी मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात यश मिळेल. नावलौकिक मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. शुभ दि. 30, 1 

सिंह – वक्तव्य जपून करा

सिंहेच्या व्ययेषात मंगळ, चंद्र, गुरू युती. उत्साह, आत्मविश्वास यावर नियंत्रण ठेवा. प्रवासात सावध रहा. मैत्रीत, नात्यात कोणतेही वक्तव्य जपून करा. नोकरी टिकवा. सहनशीलता बाळगा. धंद्यात उतावळेपणा नको. वाद नको. वस्तू जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायद्याला धरून चर्चा करा. प्रसंगानुरूप तटस्थ धोरण महत्त्वाचे. शुभ दि. 3, 4 

कन्या – नवीन परिचय प्रेरणादायी

कन्येच्या एकादशात मंगळ, चंद्र शुक्र लाभयोग. आनंदात भर पडणारी घटना घडेल. महत्त्वाची, कठीण कामे रेंगाळत ठेवू नका. नवीन परिचय प्रेरणादायी वाटेल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगतीची संधी मिळेल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. धंद्यात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मान, प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल. शुभ दि. 2, 3 

तूळ – सौम्य भाषेत बोला

तूळेच्या दशमेषात मंगळ, चंद्र मंगळ युती. क्षेत्र कोणतेही असो सावधपणे प्रतिक्रिया द्या. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्यावा लागेल. ताणतणाव, चिंता जाणवेल. सौम्य भाषेत बोला. नोकरी टिकवा. धंद्यात तुमचा अंदाज चुकू शकतो. मोह नको. व्यसनाने नुकसान होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परिस्थितीचा अभ्यास करा. शुभ दि. 4, 5 

वृश्चिक – नवी संधी मिळेल

वृश्चिकेच्या भाग्येषात मंगळ, चंद्र शुक्र लाभयोग. मनाविरुद्ध घटनांमुळे विचलित होऊ नका. महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. नोकरीत दगदग झाली तरी प्रभाव वाढेल. धंद्यात मोठे काम मिळेल. गोड बोला. परिचय वाढतील. तुमच्या क्षेत्रात नवी संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कुणालाही कमी लेखू नका. तुमची प्रतिमा अधिक उजळेल. शुभ दि. 30, 2 

धनु – कार्याला दिशा देता येईल

धनुच्या अष्टमेषात मंगळ, चंद्र बुध लाभयोग. उत्साहात भर पडणारी घटना घडेल. कार्याला नवी दिशा देता येईल. सर्व मनाप्रमाणेच घडेल अशा भ्रमात राहू नका. संयम ठेवा. भावनेच्या आहारी जाऊ नका. वस्तू सांभाळा. नोकरीत दगदग जाणवेल. नवी संधी मिळेल. प्रवासात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर ताणतणाव जाणवेल. शुभ दि. 30, 4 

मकर – नोकरीत बदल घडेल

मकरेच्या सप्तमेषात मंगळ, चंद्र शुक्र लाभयोग. तुमच्य क्षेत्रात प्रगतीपथावर राहाल. कला, क्रीडा, साहित्यात नवा विषय, ओळखी वाढतील. यश मेळेल. नोकरीत चांगला बदल घडेल. धंद्यातील ताण कमी करण्याचा मार्ग दिसेल. लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चांगल्या पद्धतीचे कार्य करून दाखवाल. प्रतिष्ठा, लोकप्रियता लाभेल. शुभ दि. 30, 1 

कुंभ – वर्चस्व जाणवेल

कुंभेच्या षष्ठेशात मंगळ, सूर्य चंद्र लाभयोग. उत्साहाने प्रेरित व्हाल. आनंदाची घटना घडेल. कुणालाही कमी समजू नका. शेजारी क्षुल्लक तणाव करतील. नोकरीत वर्चस्व जाणवेल. कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. विचारांची देवाणघेवाण होईल. प्रवासाचा आनंद घ्याल. शुभ दि. 30, 1 

मीन – कामाची प्रशंसा होईल

मीनेच्या पंचमेषात मंगळ, चंद्र गुरू युती. प्रत्येक दिवस यशाचे शिखर गाठणारा ठरेल. भेटीत, चर्चेत यश मिळेल. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. वरिष्ठांशी मैत्री वाढेल. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळेल. वसुली करा. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. लोकप्रियतेत भर पडेल. शुभ दि. 30, 1

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोणी घर देता का  घर ? मुंबईकराचं स्वप्नं कधी होणार पूर्ण ? घर महागणार,  रेडीरेकनर दरांमध्ये वाढ कोणी घर देता का घर ? मुंबईकराचं स्वप्नं कधी होणार पूर्ण ? घर महागणार, रेडीरेकनर दरांमध्ये वाढ
मुंबई हे स्वप्नांचं शहर म्हणून ओळखलं जातं, आणि याच शहरात आपलं एक तरी घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. करोडो...
‘मी जिथे 10 वर्षांपासून राहत नाही तिथे..’; कुणाल कामराचा मुंबई पोलिसांना टोमणा
Disha Salian Case: दिशा सालियनचा मृत्यू आत्महत्या नाही तर, पूर्वनियोजित मर्डर? ‘ते’ पेनड्राईव्ह, गँगरेप आणि हत्येचा दावा
IPL 2025 – मुंबईच्या विजयानंतरही हार्दिक पंड्या ट्रोल, एका चुकीमुळे 23 वर्षीय खेळाडूचा विक्रम हुकला; आता पुन्हा संधी नाही
शुभमंगल ‘सावधान’! महागाईमुळे लग्नावर होणार दुप्पट खर्च
CBSC कडून 10, 12 वीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल; गुणांएवजी ग्रेड पद्धती आणणार
Sikandar- भाईजानच्या ‘सिंकदर’चा प्रभाव पडला फिका! पहिल्या दिवशीच्या कमाईचा आकडा अपेक्षेपेक्षा खूप कमी!