कुटुंब असूनही संतोष जुवेकर एकटा का राहतो? अवधूत गुप्तेनं सांगितलं खरं कारण

कुटुंब असूनही संतोष जुवेकर एकटा का राहतो? अवधूत गुप्तेनं सांगितलं खरं कारण

‘छावा’ चित्रपटानंतर अभिनेता संतोष जुवेकरला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. छावामधील त्याच्या अभिनयाबद्दल तर सर्वांनी कौतुक केलं पण जेव्हा ‘छावा’च्या निमित्ताने त्याच्या काही मुलाखती झाल्या तेव्हा तो त्या मुलाखतींमध्ये चित्रपटाबद्दल किंवा अक्षय खन्नाबाबत जे काही बोलला त्यापैकी काही विधान त्याची एवढी व्हायरल झाली की त्याला ट्रोल करण्यात आलं. आणि ही ट्रोलिंग अजूनही सुरुच आहे.

वैयक्तिक आयुष्यातही संतोष तितकाच संघर्ष करतोय

एकीकडे संतोष जुवेकर ट्रोलिंगचा सामना करतोय तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यातही संतोष तितकाच संघर्ष करत आहे. याबद्दल फारस कोणाला माहित नसेल. पण ,संतोष त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार काही बोलताना कधीही दिसत नाही. अनेकांना हे माहित नसेल की आई-वडील असून, त्याचे कुटुंब असून संतोष एकटा राहतो.

संतोष जुवेकरच्या एकटं राहण्याबद्दल काय म्हणाला अवधूत गुप्ते

पण त्याच्या एकटं राहण्याबद्दल अवधूत गुप्तेनेच खुलासा केला आहे. अवधूत गुप्ते आणि संतोष खूप चांगले मित्र आहेत हे सर्वांनाच माहित आहे. संतोष आणि अवधूत यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. त्यामुळे त्यांची मैत्री घट्ट झाली आहे. संतोषच्या अभिनयासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल सांगताना अवधूत म्हणाला, “झेंडा’ चित्रपटात ‘संत्या’ची भूमिका जिवंत करण्यासाठी संपूर्ण शूटिंगदरम्यान तो चाळीत राहिला होता. ‘मोरया’च्या वेळीही त्याने असंच केलं. ‘एकतारा’ हा चित्रपट गायकाच्या आयुष्यावर आधारित असल्याने, त्या भूमिकेसाठी तो तब्बल एक वर्ष गिटार आणि गायन शिकत होता. त्याने माझ्या अनेक कार्यक्रमांना केवळ निरीक्षण करण्यासाठी हजेरी लावली होती.”

अवधूत पुढे म्हणाला, “इतर दिग्दर्शकांसोबत काम करतानाही संतोष तितकीच मेहनत घेतो. हीच जर त्याची अॅक्टिंग ‘मेथड’ असेल, तर आपण ती स्वीकारली पाहिजे. कारण त्याचा अभिनय निर्विवादपणे उत्कृष्ट असतो” असं म्हणत त्याने मित्राच्या मेहनतीचं कौतुक केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Juvekar Santosh (@santoshjuvekar12)

कुटुंब असतानाही एकटा का राहतो संतोष जुवेकर?

तसेच संतोष जुवेकर त्याचं कुटुंब असूनही वेगळा का राहतो? याबद्दलही अवधूतने त्याच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे. त्याने सांगितलं की, “तो अभिनयासाठी इतका झपाटलेला आहे की तो आजही एकटाच राहतो. मात्र, तो आपल्या आई-वडिलांची आणि पुतणीची काळजी घेतो. अभिनयाच्या ह्याच वेडापाई संतोष आजही एकटा राहतो. अर्थात, एकटा राहत असून सुद्धा त्याच्या एकट्याचा संसार हा दृष्ट लागण्यासारखा आहे. त्याचं घर कधीही जाऊन बघा. एखाद्या गृहिणीलाही लाजवेल इतकं टापटीप असतं. एकटा राहूनही त्याचा संसार सुरळीत आहे. कुठल्याही मराठी अभिनेत्याप्रमाणे त्यालाही काटकसर करावी लागते. मात्र, त्याने कधी कुणाचे पैसे बुडवल्याचं किंवा नको ती देणी करून ठेवल्याचं ऐकिवात नाही.” असं म्हणत त्याने मित्राची बाजू घेतली.

ट्रोल करणाऱ्यांना अवधूत गुप्ते काय म्हणाला?

संतोष जुवेकरवर टीका करणाऱ्यांना अवधूत गुप्तेने चांगलेच खडे बोल सुनावले. तो म्हणाला, “संतोषने एखाद्या चित्रपटानंतर जरा अधिक श्रेय घ्यायचा प्रयत्न केला, तर लगेच त्याची खिल्ली उडवली जाते. मात्र, वर्षानुवर्षे संघर्ष करून यश मिळवल्यानंतर आनंद साजरा करणं हास्यास्पद नाही, तर ते त्याच्या मेहनतीचं फळ आहे.”

“कलाकारांच्या भावनांचा विचार न करता ट्रोलिंग…”

अवधूत गुप्ते म्हणतात, “ही फक्त संतोषची शोकांतिका नाही, तर अनेक मराठी कलाकारांची आहे. एखादा कलाकार वर्षभर मेहनत करून चित्रपट काढतो आणि रिलीज झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोक विचारतात, बाकी नवीन काय करतोयस? कलाकारांच्या भावनांचा विचार न करता केलेलं ट्रोलिंग म्हणजे फक्त क्रूर विनोद आहे. दगडावर उमलू पाहणाऱ्या फुलाचा संघर्ष कबरीवरच्या बुरशीला कधीच कळणार नाही” अशी खंतही अवधूतने व्यक्त केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला नागपुरात, RSS स्मृती भवन आणि दीक्षाभूमीला भेट देणार,कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शीगेला पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला नागपुरात, RSS स्मृती भवन आणि दीक्षाभूमीला भेट देणार,कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शीगेला
हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याला नागपूरात दरवर्षी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत संबोधन करीत असतात. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत...
IMD Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट; पुढील 24 तास धोक्याचे, आयएमडीकडून मोठी बातमी
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; 2100 रुपयांबाबत आतली बातमी समोर
मुंबईत भीषण अपघात, कार एकमेकांवर आदळल्या; दोघांचा मृत्यू
‘सैतानाने मला कधी विवस्त्र केले कळाले नाही’, मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य
उसाचा किंवा द्राक्षांचा रस नाही तर प्या चंदनाचं सरबत, दिसतील चमत्कारिक फायदे, कसं बनवायचं पाहा
तुमची त्वचा कोरडी आहे? हे घरगुती टोनर सर्वोत्तम, त्वचेच्या समस्या लवकरच होतील दूर