आईच्या हट्टामुळे करिश्माची झालेली वाईट अवस्था, रक्त बंबाळ झालेली अभिनेत्री

अभिनेत्री करिश्मा कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत करिश्माने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आज अभिनेत्री अभिनयापासून दूर आहे. पण सिनेमांमधील तिचे किस्से आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. दरम्यान, गाण्याच्या शुटिंग दरम्यान करिश्माच्या दुखापत झाली होती, ज्यासाठी अभिनेत्री आई जबाबदार होती. बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिग्राफर गणेश आचार्य याने याबद्दल सांगितलं आहे. तेव्हा करिश्मा अभिनेता गोविंदा याच्यासोबत ‘गोरिया चुरा ना मेरा जिया’ गाण्यासाठी शुटिंग करत होती.
गणेश आचार्य म्हणाला, ”गोरिया चुरा ना मेरा जिया’ गाण्याचं शुटिंग सुरु होतं. तेव्हा गोविंदा डान्स स्टेप करत होता. सीनमध्ये फक्त गोविंदाला पाहिल्यानंतर करिश्माच्या आई माझ्याकडे आल्या आणि मला विचारलं डान्समध्ये करिश्मा का नाही… तेव्हा मी अभिनेत्रीच्या आईला सांगितलं, गुडघ्यांवर डान्स आहे…’
‘यावर मला त्या म्हणल्या, गुडघ्यांवर आहे म्हणून काय झालं… डान्समध्ये करिश्मा देखील हवी. करिश्माने शॉट घातलं आहे. तिच्या पायाला लागेल. गोविंदाने स्टेपसाठी पुर्ण काळजी घेतली आहे. त्याने गुडघ्यांना पॅड लावलं आहे… असं सांगून देखील बबीता मान्य झाल्या नाहीत…’
‘अखेर करिश्माला गुडघ्यांवर डान्स करावाच लागला. स्टेप पूर्ण झाल्यानंतर करिश्माच्या गुडघ्यातून रक्त येऊ लागलं. यासाठी जबाबदार पूर्णपणे बबीता कपूर आहे.’ सांगायचं झालं तर, 90 च्या दशकात प्रदर्शित झालेलं ‘गोरिया चुरा ना मेरा जिया’ गाण आजही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.
पुढे गणेश आचार्य म्हणाला, ‘करिश्मा आज जे काही आहे, त्यामध्ये तिची मेहनत आणि तिच्या आईचं योगदान आहे. करिश्मा प्रचंड मेहनती आहे. त्याचमुळे करिश्मा आज करिश्मा आहे… फक्त करिश्माच नाही करीना कपूरच्या करीयरसाठी देखील बबीता यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.’
सांगायचं झालं तर, ‘गोरिया चुरा ना मेरा जिया’ हे गाणं 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुली नं 1’ सिनेमातील आहे. सिनेमाने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं.
करिश्मा कपूर आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List