60 वर्षांचा आमिर खान एका मुलाची आई असलेल्या गौरीच्या प्रेमात का पडला? स्वत:च सांगितलं कारण

60 वर्षांचा आमिर खान एका मुलाची आई असलेल्या गौरीच्या प्रेमात का पडला? स्वत:च सांगितलं कारण

सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती आमिर खानची. आमिर आणि त्याची कथित गर्लफ्रेंड यांच्या चर्चा सध्या सर्वत्र होत आहेत. पण या बातमीमुळे सर्वांकडूनच आमिर खानला ट्रोल केलं जात आहे. आमिर खानची कथित गर्लफ्रेंड गौरीबद्दल फार कमी जणांना माहित असेल. तसेच आमिर आणि गौरी नक्की कसे प्रेमात पडले किंवा कधीपासून ते एकमेकांना ओळखत होते त्याबद्दल फार कमी जणांना माहित असेल.

गौरीने सांगितलं आमिरवर प्रेम करण्याचं कारण 

गौरी स्प्राट आणि आमिर खान गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. पण गेल्या 18 महिन्यांपासून दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रेमाच्या भावना आहेत. मात्र, आमिरने त्यांच्या या नात्याबद्दल कोणालाही याबद्दल कळू दिले नाही. बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टने त्याचं हे नातही तसंच परफेक्टपणेच हाताळण्याचा प्रयत्न केला आहे . आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्राटने आमिरबद्दल तिला काय आवडतं ते अखेर सर्वांसमोर बोलून दाखवलं आहे.

गौरीला बॉलिवूडची फारशी चाहती नाहीये

गौरीला बॉलिवूडची फारशी चाहती नाहीये आणि तिने आमिरचे फक्त दोनच चित्रपट पाहिले आहेत. मग ती आमिरच्या प्रेमात कशी काय पडली? असा प्रश्न नक्कीच चाहत्यांनाही पडला आहे. गौरीच्या वाढदिवसानिमित्त मीडियासमोर तिची ओळख करून देताना आमिरने त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं. आमिरने सांगितले की ते 25 वर्षांपूर्वी भेटले होते पण त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला होता. दोन वर्षांपूर्वी ते पुन्हा भेटले. आमिर म्हणाला, ‘मी अशा व्यक्तीच्या शोधात होतो जिच्यासोबत मी शांततेत राहू शकेन आणि ती होती गौरी’

‘ती मला सुपरस्टार म्हणून नाही तर एक जोडीदार म्हणून पाहते.’

गौरीला आमिरच्या चित्रपटांची फारशी माहिती नाही कारण ती जास्त हिंदी चित्रपट पाहत नाही. जेव्हा मीडियाने गौरीला आमिरच्या आवडत्या चित्रपटांबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले की तिने फारसे चित्रपट पाहिलेले नाहीत. आमिर म्हणाला, ‘ती बंगळुरूमध्ये वाढली आणि तिने वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट पाहिले आहेत. ती हिंदी चित्रपट पाहत नाही. गौरीने सांगितले की तिने ‘दिल चाहता है’ आणि ‘लगान’ पाहिला होता. आमिर म्हणाला, ‘ती मला सुपरस्टार म्हणून नाही तर एक जोडीदार म्हणून पाहते.’ तथापि, आमिरची इच्छा आहे की गौरीने ‘तारे जमीन पर’ नक्कीच पहावा.

गौरीने आता मुंबईतही स्वतःचे नाव कमावले

गौरी स्प्राट कदाचित बॉलिवूडची चाहती नसेल, पण तिची स्वतःची एक कहाणी आहे. ती बेंगळुरू येथील रीटा स्प्रेट यांची मुलगी आहे, ज्यांचे शहरात एक सलून होते. आयुष्याचा बराचसा काळ तिथे घालवल्यानंतर, गौरीने आता मुंबईतही स्वतःचे नाव कमावले आहे. तिच्या लिंक्डइन प्रोफाइलवरून असे दिसून येते की ती शहरात एक बेब्लंट सलून चालवते. तिला सहा वर्षांचा एक मुलगा देखील आहे.

गौरीने तिच्या आणि आमिरच्या नात्याबद्दल बोलताना म्हटलं की ‘मला एक दयाळू आणि काळजी घेणारी व्यक्ती हवा होता.’ यावर आमिर गंमतीने म्हणाला, ‘आणि एवढ्या सगळ्यानंतर तू मला भेटलीस’ हा संवाद जेव्हा त्यांनी त्यांचे नाते सर्वांसमोर उघड केलं तेव्हा झालेला आहे. या संवादावेळी त्यांच्यातील निखळ प्रेम हे दिसून येत होतं.

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मला फार्महाऊसवर बोलावलं, जाऊ दिलं नाही…; दबंगमधील खलनायकाच्या मुलीने केला सलमानचा पर्दाफाश मला फार्महाऊसवर बोलावलं, जाऊ दिलं नाही…; दबंगमधील खलनायकाच्या मुलीने केला सलमानचा पर्दाफाश
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘दबंग’ हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. 2019मध्ये ‘दबंग 3’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटात साऊथचा...
“प्लीज मला एक्स वाइफ बोलू नका..”; ए. आर. रेहमान यांच्या पत्नीची विनंती
सेल्फीच्या नादात चाहत्याने दिला काजोलच्या पायावर पाय, काजोलने जी रिअॅक्शन दिली…
आमिर खान आणि त्याच्या नव्या गर्लफ्रेंडच्या वयात इतक्या वर्षांचं अंतर
त्वचेपासून ते आरोग्यापर्यंत ‘या’ पाच प्रकारे एरंडेल तेल फायदेशीर
राज्यातील भाजपा युती सरकार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार: हर्षवर्धन सपकाळ
पाक सैन्याच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला, 90 सैनिक ठार; BLA चा दावा