‘हम होंगे कंगाल…’ स्टुडीओच्या तोडफोडीवर कुणाल कामाराचा आणखी एक गाण्याचा व्हिडीओ व्हायरल
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनोदातून टीका केली होती. ज्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी जोरदार निषेध केला. रविवारी शोची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद आणखी वाढला. यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हॅबिटॅट क्लबची तोडफोड केली. या प्रकरणात पोलिसांनी 12 जणांना अटक केली, ज्यांना सोमवारी जामीन मिळाला. तसेच, शिवसेनेच्या 40 कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला.
कुणालचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल
पण आता कुणाल कामराचे असे अनेक व्हिडीओ आहेत जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे यांच्यावरील गाण्यानंतर आता अजून एक गाण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओतील गाण्याच्या माध्यमातून त्याने पंतप्रधान मोदींवरच निशाणा साधला आहे. पण कुणालचे हे गाणे आताचे नसून त्याचा हा जुना व्हिडीओ आहे. पण सध्या त्याने एकनाथ शिंदेंवर त्याच्या गाण्यातून जी काही टीका केली. त्यानंचर मोठा वाद तर झालाच पण त्याचे जुने गाण्याचे व्हिडीओही आता एक एक करून व्हायरल होऊ लागले आहेत.
पंतप्रधान मोदींवर टीका…
‘हम होंगे कंगाल…’ हे गाणं त्याने गायलेलं जुनं गाणं आहे. या गाण्याच्या माध्यमातून त्याने पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. बेरोजगारी आणि महागाई या सर्व मुद्द्यावंरून त्याने हे गाणे बनवले होते. पण आता ते गाणे पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. याचं कारण असं की एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर त्याच्या शो झालेल्या हॅबिटॅट क्लबची तोडफोड केली. त्यानंतर कुणालचे हे गाणे आता त्याच्यासाठी खरं ठरलं असं म्हणतं त्याचा हा गाण्याचा व्हिडीओ त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणार असल्याचं म्हणत पुन्हा एकदा हा व्हिडीओ व्हायरल केला जात आहे.
त्याने म्हटलेलं गाणं असं होतं….
हम होंगे कंगाल, एक दिन
मन मै अंधविश्वास, देश का सत्यानाश
हम होंगे कंगाल, एक दिन
होगे नंगे चारो और, करेंगे दंगे चारो ओर
पोलिस के पंगे चारो ओर, एक दिन
मन मै नत्थुराम, हरकते आसाराम
हम होंगे कंगाल, एक दिन
होगा गाय का प्रचार, लेके हाथो मे हत्थियार
होगा संघ का शिष्टाचार, एक दिन
जनता बेरोजगार, गरीबी की कागार
हम होंगे कंगाल, एक दिन
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List